ETV Bharat / sitara

'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटावर बहिष्कार घालण्याची सोशल मीडियावर मागणी

author img

By

Published : Oct 17, 2020, 1:21 PM IST

अक्षय कुमरच्या 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी ट्विटरवर करण्यात येत होती. अनेक युजर्सनी या चित्रपटात ट्रान्स समुदाय पुराणमतवादी असल्याचे दाखवण्यात आल्याचा आरोप केलाय तर, काहींना हा लक्ष्मीदेवीचा अपमान वाटतोय.

'Lakshmi Bomb'
लक्ष्मी बॉम्ब'

मुंबई - अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेला हॉरर कॉमेडी 'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट काल ट्विटरवर दिवसभर ट्रेंडमध्ये राहिला. अनेक करण्यासाठी हा ट्रेंड सुरू होता. नेटिझन्सचा एक विभाग ट्रान्सजेंडर समुदाय पुराणमतवादी असल्याचा आरोप करीत आहे. त्याचवेळी एका गटाला असे वाटते की, हा हिंदू देवी लक्ष्मीचा अपमान आहे. तर, काहीजण चित्रपटाच्या माध्यामातून लव्ह जिहादचे प्रमोशन सुरू असल्याचा आरोप करीत आहेत. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या पात्राचे नाव असिफ असे आहे, तर पत्नीची भूमिका साकारणारी कियारा अडवाणी हिचे नाव प्रिया आहे.

एका युजरने लिहिले की, '''लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटात ट्रान्स समुदायाला रुढीवादी दाखवल्याबद्दल बहिष्कार घाला. कलेच्या माध्यमातून भेदभाव करण्यासाठी धार्मिक अँगलमधून दाखवणे बंद करा.''

आणखी एका युजरने म्हटलंय की, "हा एक जातीय चित्रपट असून यावर बंदी घातली पाहिजे."

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. भारतात हॉटस्टारवर हा सिनेमा रीलिज होईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, यूएई येथे थिएटरमध्ये ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा रिलीज केला जाईल. तर हॉटस्टारवर अमेरिका, युके, कॅनडामध्ये पाहता येणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.