ETV Bharat / sitara

मानहानी प्रकरण: कोर्टातून दिलासा मिळवण्यासाठी कंगनाने नव्याने दाखल केला अर्ज

कंगना रणौत हिने लेखक जावेद अख्तर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल ,जावेदअख्तार यांनी फौजदारी मानहानी दावा कंगना विरोधात दाखल केला होता. फौजदारी मानहानीच्या तक्रारी विरोधात कंगनाने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलासा मिळण्यासाठी आता एक अर्ज दाखल केला आहे.

Defamation case: Kangana
कंगना रणौत
author img

By

Published : Jun 25, 2021, 8:13 PM IST

मुंबई - अर्णव गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखती दरम्यान कंगना रणौत हिने लेखक जावेद अख्तर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल ,जावेदअख्तार यांनी फौजदारी मानहानी दावा कंगना विरोधात दाखल केला होता. फौजदारी मानहानीच्या तक्रारी विरोधात कंगनाने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलासा मिळण्यासाठी आता एक अर्ज दाखल केला आहे.

कामासाठी बाहेर जावे लागते

कंगनाने दाखल केलेल्या अर्जात विनंती केली आहे की ती अभिनेत्री असल्याने शुटिंगसाठी तिला देशाच्या कानाकोपऱ्यात जावे लागते आणि काही वेळा कार्यक्रमासाठी परदेशातही जावे लागते. प्रॉडक्शन हाऊस अशा शूट आणि ठिकाणांसाठी बरीच गुंतवणूक करतात. ज्यामुळे अभिनेत्रीने त्या कार्यक्रमांमध्ये पोहोचणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद तिने अर्जात केला आहे.

प्रवास करणे कठीण होईल

कंगनाने आपल्या अर्जात असे म्हटले आहे की नियमितपणे खटल्यात हजर होण्यासाठी तिला आपल्या कामाच्या ठिकाणाहून परत मुंबईला यावे लागेल. ज्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि ती तिची व्यावसायिक बांधिलकी पूर्ण करू शकणार नाही. यासह प्रॉडक्शन हाऊसचेही मोठे नुकसान होणार आहे.

कोर्टाच्या सुनावणीवर कोणताही परिणाम होणार नाही असे कंगनाने अर्जात सांगितले आहे. कंगनाने आश्वासन दिले आहे की ती सुनावणीत नसल्याने कोणतीही अडचण होणार नाही. ती तिच्या वकीलामार्फत प्रत्येक सुनावणीला हजर होईल.

जावेद अख्तर यांच्या वकिलांनी केला विरोध

कंगनाच्या या अर्जाला जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि कोरोनाच्या नियमांमुळे, कोणासही हजर राहण्याचा कोर्टाचा आदेश देता येत नाही. ज्यामुळे कोर्टाने सूट दिली आहे.

काही काळापूर्वी कंगनाने एक याचिका दाखल केली होती, ज्यात तिने जावेद अख्तर यांच्या मानहानीप्रकरणी पुनर्विचार करण्याची मागणी केली होती, परंतु ती दिंडोशी कोर्टाने फेटाळली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर कंगनाने एक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांचे नाव घेतले होते, त्या कारणामुळे जावेद अख्तर यांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - इंदिरा गांधीच्या भूमिकेत अवतरणार कंगना रणौत, 'इमर्जन्सी'ची तयारी सुरू!!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.