मुंबई - बॉलिवूड दिवा दीपिका पदुकोण तिच्या अलीकडच्या एअरपोर्ट लूकमुळे ट्रोल होत आहे. रविवारी मुंबईतील कलिना विमानतळावर अभिनेत्री दीपिका अवतरली होती. दीपिकाने ऑल-डेनिम लूक निवडला जो नेटिझन्सना प्रभावित करण्यात अयशस्वी ठरला आहे.
शलीना नथानीने स्टाइल केलेली दीपिका विमानतळावर डेनिम-ऑन-डेनिम लूकमध्ये दिसली. दीपिकाचा एअरपोर्ट लुक एका मोठ्या आकाराच्या निळ्या डेनिम क्विल्टेड जॅकेटचा होता जो मॉम जीन्ससोबत जोडलेला होता. फॅशनसाठी प्रसिध्द असलेली दीपिकाच्या या एअरपोर्ट लूकवर नेटिझन्सनी भरपूर टीका केली आहे.
दीपिकाचा लेटेस्ट एअरपोर्ट लूक व्हायरल झाल्यानंतर लगेचच कीबोर्ड वॉरियर्सने तिच्या पोशाखासाठी हल्ला बोल चढवला. एका युजरने लिहिले, "रणवीर के कपडे पहन लिए क्या दीदी." तर दुसर्याने प्रश्न केला, "टाचेला काय झालंय?". दीपिकाने टाचांवरही मोजे घालण्यावरुनही काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
एका युजरने पती-पत्नी दोघांनाही नवीन स्टायलिस्टची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आणि लिहिले: "मोजे असलेल्या त्या सँडल भयानक दिसतात! तिला नवीन स्टायलिस्टची गरज आहे, खरं तर, पती-पत्नी दोघांनाही आहे. कृपया आता ही फॅशन फॉलो करू नका, हे अजिबात दर्जेदार नाही!"
दरम्यान, दीपिकाकडे अनेक मनोरंजक चित्रपट आहेत. 'द इंटर्न'च्या हिंदी रुपांतरात ही अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. ती 'फायटर'मध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे आणि 'पठाण'मध्ये ती शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दीपिकाकडे नाग अश्विनच्या साय-फाय चित्रपटात प्रभास आणि बिग बी सह कलाकार आहेत.
हेही वाचा - बुतशिकन जावळी : अनोख्या नावाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झाले प्रदर्शित!