नवी दिल्ली - जागतिक महिला दिन जगभर साजरा होत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी ‘व्हरायटी इंटरनॅशनल विमेन इम्पॅक्ट रिपोर्ट’ बनविला जातो. ज्यात जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील 50 स्त्रियांचा सन्मान केला जातो. हा सन्मान कुठल्याही आंतरराष्ट्रीय पुरस्कारापेक्षा कमी नाही. यात भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणचा नंबर लागलाय.
दीपिका पादुकोणचे सिनेमातील योगदान आणि 2021 च्या विविधता आंतरराष्ट्रीय महिला अहवालात परोपकारी प्रयत्नांमध्ये भाग घेतल्याबद्दल कौतुक होत आहे. दीपिका पादुकोण यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपिकाने आपले चित्रपट आणि एनजीओ ‘लिव्ह लाफ लव्ह’ मधून महिला सक्षमीकरणाचे कार्य केले आहे. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा घेतली गेली आहे. 2015 साली मनोरंजनसृष्टीत मानसिक आरोग्याविषयी संवाद सुरू करणारी ती पहिली अभिनेत्री आहे. तसेच ‘पद्मावत’, ‘छपाक’ मधील भूमिकांमधून तिने सामाजिक विचारधारेला जागृत केलं आणि सामाजिक विचारसरणीत बदल घडवून आणले. या कलासक्त अभिनेत्रीचा परिचय देताना व्हरायटीने लिहिले की, “बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोणने ‘छपाक’ या चित्रपटाची निर्मिती केली आणि अभिनय केला, ज्यात अॅसिड हल्ल्यापासून वाचलेल्या एका स्त्रीचा शारीरिक व मानसिक लढा प्रेरणादायक पद्धतीने दर्शविला होता. त्याआधी स्त्री सन्मान राखण्यासाठी ‘जोहार’ करणाऱ्या राणी पद्मावतीची सामाजिक बदल घडवून आणणारी भूमिका तिने साकारली होती. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कलाकाराला सन्मान देणे आमचा सन्मान आहे.
तिच्या प्रवासाविषयी दीपिका म्हणाली की, ‘भूमिका निवडताना माझ्या आणि भूमिका यामध्ये ‘बजेट’ कधीच आडवं आलं नाही. मी माझ्या भूमिका नेहमीच माझ्या मर्जीनुसार निवडल्या आणि त्यात मी आयुष्याच्या कुठल्या मानसिक स्थितीत आहे हे महत्वाचे होते.’ दीपिका पदुकोणचा हा आंतरराष्ट्रीय सन्मान आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने होत आहे.