ETV Bharat / sitara

ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला दिले होते 500 कोटी बजेटच्या चित्रपटाचे वचन - Sukesh's gift of crores to Jacqueline

ठग सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला चित्रपट निर्मितीचे वचन दिले होते. सुकेशने जॅकलीनला काही बनावट आणि ए-लिस्ट निर्मात्यांची नावेही दिली होती. सुकेशने जॅकलीनला सांगितले होते की, तो तिच्यासोबत ५०० कोटींच्या बजेटमध्ये एक महिला सुपरहिरो चित्रपट तयार करणार आहे.

सुकेश चंद्रशेखरचे जॅकलीनला चित्रपट निर्मितीचे वचन

author img

By

Published : Dec 20, 2021, 10:35 PM IST

मुंबई - दिल्लीतील तिहार तुरुंगात 200 कोटींची फसवणूक करणारा ठग सुकेश चंद्रशेखर याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सुकेशला त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये त्याची कथित गर्लफ्रेंड जॅकलिन फर्नांडिससोबत चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सुकेशने जॅकलिनला करोडोंची भेट दिली आहे.

इंडिया टुडेमधील एका बातमीनुसार, ठग सुकेश चंद्रशेखर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आकर्षित करण्यासाठी एक मोठी योजना आखत होता. रिपोर्टनुसार, सुकेशने जॅकलिनला एका चित्रपटाची निर्मिती करण्याचे वचन दिले होते. सुकेशने जॅकलीनला काही बनावट आणि ए-लिस्ट निर्मात्यांची नावेही दिली होती. सुकेशने जॅकलीनला सांगितले होते की, तो तिच्यासोबत ५०० कोटींच्या बजेटमध्ये एक महिला सुपरहिरो चित्रपट तयार करेल. हा चित्रपट तीन भागात बनवला जाईल असेही सांगण्यात आले होते.

रिपोर्टनुसार, सुकेशला हे चांगलंच माहीत होतं की जॅकलिन बॉलिवूडमध्ये कामाच्या शोधात आहे आणि तिच्या हातात जास्त चित्रपट सापडत नाहीत. अशा स्थितीत सुकेशने जॅकलीनला आकर्षित करण्यासाठी तिचा वापर केला. अशा परिस्थितीत सुकेशने जॅकलिनला वचन दिले होते की तो तिच्यासोबत भारतातील पहिला महिला सुपरहिरो चित्रपट तयार करणार आहे. ज्यामध्ये हॉलीवूडचे व्हीएफएक्स कलाकार काम करतील. या चित्रपटाचे जागतिक स्तरावर चित्रीकरण होणार असल्याचेही सांगण्यात आले होते.

सुकेशने जॅकलीनला सांगितले की ती हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीसारखीच आहे आणि ती सुपरहिरो मालिकेला पात्र आहे. त्याचवेळी जॅकलीनला सुकेशवर विश्वास बसू लागला की सुकेश खरोखरच त्याच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन करत आहे.

सुप्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनी रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकाच्या पत्नीची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुकेश दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. त्याचबरोबर सुकेश फेब्रुवारी २०२१ पासून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या सतत संपर्कात असल्याचा तपास ईडी करीत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेशने जेलमधून जॅकलिनला 10 कोटी रुपयांहून अधिक किमतीची भेटवस्तू पाठवली होती. यासोबतच सुकेशने जामिनावर बाहेर येताना अभिनेत्रीसाठी मुंबई ते चेन्नईचे चार्टर्ड फ्लाइटही बुक केले होते.

हेही वाचा - Spider Man On Box Office : स्पायडर मॅनचा बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ, 138. 55 कोटींची विक्रमी कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.