मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी आणि मिस्टर परफेशनिस्ट यांच्यात बॉक्स ऑफिसवर क्लॅश पाहायला मिळणार आहे. २०२० मधील ख्रिस्मस हे दोघांच्याही चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवाणी ठरणार आहे. आता हे चित्रपट कोणते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही उत्सुक असाल.
आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' आणि अक्षयचा 'बच्चन पांडे' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. अक्षयच्या 'बच्चन पांडे'चं फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करत नुकतंच चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. तर आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा १९९४ मध्ये आलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे.
-
The clash is CONFIRMED... Aamir [#LaalSinghChaddha] vs Akshay [#BachchanPandey]... #Christmas 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) July 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The clash is CONFIRMED... Aamir [#LaalSinghChaddha] vs Akshay [#BachchanPandey]... #Christmas 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) July 26, 2019The clash is CONFIRMED... Aamir [#LaalSinghChaddha] vs Akshay [#BachchanPandey]... #Christmas 2020.
— taran adarsh (@taran_adarsh) July 26, 2019
‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तर अक्षय कुमारच्या बच्चन पांडेचं दिग्दर्शन फरहाद सामजी करणार असून हे दोन्ही सिनेमे २०२० मध्ये ख्रिस्मसच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहेत. आता प्रेक्षकांची कोणत्या चित्रपटाला पसंती मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.