मुंबई - अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांचा 'भूत पोलिस' आणि अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी यांच्या भूमिका असलेला 'चेहरे' हा चित्रपट कोणत्या तारखेला थिएटरमध्ये झळकणार याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे.
बच्चन आणि हाश्मीने इन्स्टाग्रामवर जाऊन चित्रपटाच्या रिलीजची तारीख तसेच पहिला लूक शेअर केला आहे. “खऱ्या चेहऱ्याचा पर्दाफाश करा. ३० एप्रिल रोजी थिएटरमध्ये बहुप्रतिक्षित गूढ-थ्रिलर” असे या दोन्ही अभिनेत्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी 'चेहरे' हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट यापूर्वी जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे त्याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले होते. 'चहेरे' हा अमिता बच्चन यांचा २०२० मध्ये रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे. 'सैराट' चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्या 'झुंड'मध्ये अमिताभ यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट येत्या १८ जूनला येत आहे.
दरम्यान, 'भूत पोलिस' हा विनोदी भयचित्रपट १० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिज आणि अर्जुन मुख्य भूमिकेत आहेत.
'भूत पोलिस' चित्रपटाचे शूट गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरू झाले होते आणि फेब्रुवारीपर्यंत पूर्ण झाले होते. चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल प्रदेश, मुंबई आणि राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केले गेले आहे.
यापूर्वी 'रागिनी एमएमएस' आणि 'फोबिया' चित्रपट बनवणार्या पवन कृपलानी दिग्दर्शित 'भूत पोलिस' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचे नाव आहे.
हेही वाचा - मनोरंजक :राजकुमार हिराणीच्या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू