मुंबई - अनुपम खेर यांच्या बाबतीत न्यूयॉर्कमध्ये एक किस्सा घडला. ते टॅक्सीतून एका ठिकाणी जात असताना भारतीय ड्रायव्हर कार चालवीत होता. मात्र त्याने अनुपम यांना ओळखले नाही. उतरताना मात्र त्याने अनुपम यांना ओळखले आणि तो भरभरुन बोलायला लागला. त्याचा व्हिडिओ अनुपम यांनी शेअर केला आहे.
- anupampkher Verified Encounters in NY: #JugalKishore ji from Panjab, a yellow cab driver in NY for 30years didn’t talk to me through out my ride with him. He didn’t recognise me. Later he gave me the most flattering and the funniest reason for it. 😂🤓. He kept hugging me. We were both happy. And as always no fare was charged. 🙏😍 #IndiansInNY #Generosity #LifeLessons
या व्हिडिओबद्दल खेर यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलंय, न्यूयॉर्कमध्ये जुगल किशोर यांची अकस्मात भेट झाली. ते ३० वर्षापासून यलो कॅब चालवतात. आमच्या प्रवासात ते गप्प होते. त्यांनी मला ओळखलं नव्हतं. नंतर मात्र त्यांनी यामागचे कारण सांगितले. ते मला कडकडून भेटले. आम्ही दोघेही आनंदी झालो आणि अर्थात त्यांनी माझ्याकडून भाडे घेतले नाही.
भारतीय कलाकार जेव्हा अमेरिकेला जातात तेव्हा टॅक्सी चालकांचा त्यांना खूप चांगला अनुभव येत असतो. एकतर भारतीय मोठ्या संख्येने टॅक्सी चालक आहेत. ते बॉलिवूड सिताऱ्यांना ओळखतात आणि त्यांना भरुन पावल्यासारखे वाटते. असाच काहीसा अनुभव खेर यांना आलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनुपम खेर अलिकडेच अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात अलीकडेच झळकले होते. यात त्यांनी माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली होती.