ETV Bharat / sitara

जेएनयूत पोहोचली दीपिका, सोशल मीडियावर ट्रेंड #BoycottChapaak  #SupportDeepika

author img

By

Published : Jan 8, 2020, 2:16 PM IST

झालेल्या हिंसेच्या विरोधात विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. जेएनयूमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दीपिका पदुकोण पोहोचली होती. यावेळी कन्हैया कुमारही उपस्थित होता. पहा वृत्त सविस्तर...

Deepika Padukon in  JNU
जेएनयू पोहोचली दीपिका

नवी दिल्ली - जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेत्री दीपिका पदुकोणने भेट दिली. यावेळी कन्हैया कुमारही जेएनयूमध्ये उपस्थित होता. यावेळी कन्हैयाने जोरदार घोषणाबाजी केली होती.

कन्हैयाने यावेळी विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. गुंडांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेली विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयेशी घोषदेखील उपस्थित होती. आयेशीची दीपिकाने विचारपूस केली. दीपिका पदुकोण आगामी 'छपाक' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिल्लीत आली होती.

#BoycottChapaak हॅशटॅग झाला ट्रेंड

दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये पोहोचल्यामुळे सोशल मीडियावर छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काहीजण 'छपाक'वर बहिष्कार करण्याच्या प्रचाराला लागले आहेत.

  • Speak against nation & you will pay.

    Aamir got Snapdeal closed with his hate speech.

    SRK’s career has been finished due to his opposition by RW.

    Deepika is also going to learn it in the hard way.🤘😌#boycottdeepikapadukone #BoycottChapaak

    — Upasana Singh (@upasanasherni) January 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकाने दीपिकाच्या जेएनयू पोहोचण्याचा विरोध करीत ट्विट करत TukdeTukdeGang शब्द वापरलाय. अफजल गुरु आणि टुकडे टुकडे गँग यांचे दीपिकाने समर्थन केले. तुम्ही जर दीपिकाच्या चित्रपटावर बहिष्कार करणार असाल तर रिट्विट करा.

भाजप नेता इंदु तिवारी यांनीही ट्विट करीत दीपिकाला विरोध केलाय. याच प्रकारच्या भूमिकेमुळे शाहरूख खान, आमिर खानचे करिअर संपले. त्याच वाटेवरून दीपिका जात असल्याचे एकाने म्हटले आहे.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी हिंसेचे समर्थन करणे लज्जास्पद असल्याचे यश जैन याने म्हटलंय.

हिंदुनो जागे व्हा..दीपिकाने तुकडे तुकडे गँग जॉईन केलीय असे ट्विट अश्विन या युजरने केलंय.

दीपिकाच्या विरोधात जरी ट्रेंड सुरू झालेला असला तरी तिच्या समर्थनार्थही काही युजर उतरले आहेत. ज्या दिवशी देशाची कन्या निर्भयाला न्याय देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला त्याच दिवशी दुर्दैवाने भक्तगण अ‌ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय लेकीवर बनलेल्या सिनेमाच्या विरोधात ट्रेंड करीत आहेत.

फातिमा मुराद ही युजर म्हणते..''सर्वांना माहिती करून घेतलं पाहिजे की दीपिका क्विन आहे...''

''दीपिका तू दाखवून दिलंस, देशात तुला कोणीच रोखू शकत नाही..तूच खरी हिरो आहेस.'' एका युजरने म्हटले आहे.

  • Now bhakts will definitely spread that it was her publicity stunt bla bla!!... whatever it is..she came and stood by these students when many of so called celebrity didn't.. brave lady.... #SupportDeepika https://t.co/7pcRxOrwnd

    — Zameer Bukhari (@ZameerBukhari7) January 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी #Support Deepika हा ट्रेंड सुरू झालाय. यावर मोठ्या संख्येने लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.