मुंबई - हिंदी चित्रपटातील बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन ( hindi film Shahenshah Amitabh Bachchan ) यांच्या अतिशय जवळचा विश्वासू तसेच सर्व सुरक्षेची जबाबदारी असलेले हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे याला आज मुंबई पोलिसांनी निलंबित ( Amitabh Bachchan security Head Constable suspended ) केले आहे. जितेंद्र शिंदेवर विभागीय चौकशीदरम्यान दोषी आढळल्याने निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
2015 पासून सुरक्षेची सर्व जबाबदारी -
अभिताभ बच्चन यांच्या अतिशय जवळचा असलेले हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांच्यावर 2015 पासून सुरक्षेची सर्व जबाबदारी होती. जितेंद्र शिंदे यांच्याकडे अमिताभ बच्चन यांच्या सर्व सुरक्षेची जबाबदारी असून त्यांच्या सुरक्षेचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जितेंद्र शिंदे यांच्या जवळ उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळल्याने त्यांची चौकशी सुरू होती. काही दिवसापूर्वी वृत्तपत्रांमध्ये बातमी आली होती की जितेंद्र शिंदे यांना अभिताभ बच्चन यांच्याकडून प्रति वर्ष 1.5 कोटी रुपये मानधन मिळते. त्यानंतर जितेंद्र शिंदे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बदली दक्षिण मुंबईतील डीबी मार्ग पुलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.
जितेंद्र शिंदे यांचे निलंबन -
अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत असताना राजेंद्र शिंदे यांनी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता ४ वेळा परदेश प्रवास केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आहे. तसेच त्यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता तीन वेळा घरे खरेदी करून विकली असल्याचाही आरोप आहे. चौकशीदरम्यान जितेंद्र शिंदे यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे.
हेही वाचा - अमिताभ बच्चन यांचा सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदेंची बदली; संपत्तीची होणार चौकशी?