धर्मशाला - अभिनेता आसिफ बसरा (वय 53) यांच्या आत्महत्येच्या बातमीनंतर बॉलिवूडमधून आश्चर्य आणि दुःख व्यक्त केले जात आहे. आसिफ यांनी हिमाचल प्रदेशमधील आपल्या भाड्याने रहात असलेल्या घरात आत्महत्या केली. या घरात ते गेली ४ वर्षे राहात होते. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आसिफच्या मृत्यूच्या बातमी कळल्यानंतर करिना कपूरने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जब वी मेट या चित्रपटात तिने आसिफ यांच्यासोबत काम केले होते. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, असे लिहित करिनाने श्रध्दांजली वाहिली आहे.
पोलिस अधीक्षक विमुक्त रंजन यांनी सांगितले की, आसिफ यांनी पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा वापरुन गळफास घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा - मुंबई-किनवट-मुंबई विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबादपर्यंत...!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याच्या अगोदर आसिफ यांनी कुत्र्याला फिरवून आणले होते. अद्याप त्यांची सुसाईड नोट मिळालेली नाही.
आतापर्यंत कळलेली गोष्ट अशी आहे की, ते तणावाखाली होते. येथे ते एका ब्रिटिश महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहात होते.
हेही वाचा - ड्रग्जप्रकरणी अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात हजर
'ब्लॅक फ्रायडे', 'परजानिया', 'जब वी मेट' आणि 'काय पो छे' यासारख्या चित्रपटामधून भूमिका साकारलेले आसिफ अलिकडेच हॉटस्टारवर रिलीज झालेल्या 'होस्टेजेस' या वेब सीरिजमध्ये शेवटचे दिसले होते.
करीनाशिवाय अनुष्का शर्मा, हंसल मेहता, मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, निमरत कौर, टिस्का चोप्रा, रसुल पोकट्टी, रितेश सिधवानी या कलाकारांनी आसिफच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.