मुंबई - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या या निर्णयाचा निषेध करत भारतासोबतचे सर्व संबंध तोडण्यास सुरुवात केली. व्यापाराशिवाय भारतीय चित्रपटांवरही पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. आता यावर कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यात गायक कैलाश खेर, जॉन अब्राहम आणि चित्रपट निर्माता निखील अडवाणी यांचा समावेश आहे. कैलाश खेर म्हणाले, पाकिस्तानच्या या निर्णयानं भारताला काहीही फरक पडणार नाही. आपण सर्व आपल्या मातृभूमीचा विकास करण्यास सक्षम आहोत. त्यामुळे, पाकिस्ताननं भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्याचा काहीही फरक पडणार नाही. खरं तर यात त्यांचाच तोटा आहे. बॉलिवूडनंही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालावी का? असा सवाल केला असता खेर म्हणाले, यासाठी चित्रपटसृष्टीनं एकत्र येण्याची गरज आहे.
नुकताच आपला बाटला हाऊस चित्रपट प्रदर्शित केलेले निखील अडवाणी म्हणाले, एकीकडे आपले जवान आणि रक्षक देशासाठी लढत असताना आपण तेथे चित्रपट रिलीज करणं चुकीचं आहे. तर जॉन म्हणाला, सर्वात आधी भारत...