ETV Bharat / sitara

'बॉब बिस्वास' अखेर झाला पूर्ण, ४३ दिवस चालले शुटिंग

author img

By

Published : Dec 10, 2020, 7:30 PM IST

अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा सिंह यांच्या भूमिका असलेल्या 'बॉब बिस्वास' चित्रपटाचे शूटिंग अखेर पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे शूटिंग कोलकाता येथे ४३ दिवस चालले होते. या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, सुजॉय घोष आणि गौरव वर्मा यांनी केली आहे.

'Bob Biswas' finally completed,
'बॉब बिस्वास' अखेर झाला पूर्ण

कोलकाता - सुजॉय घोषचा बाऊंड स्क्रिप्ट प्रॉडक्शन आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट निर्मित 'बॉब बिस्वास' चित्रपटाचे शूटिंग बुधवारी रात्री कोलकातामध्ये पूर्ण झाले आहे. अभिषेक बच्चन आणि चित्रांगदा सिंह यांच्या भूमिका असलेल्या 'बॉब बिस्वास' चित्रपटाचे शूटिंग कोलकाता येथे ४३ दिवस चालले होते. दिग्दर्शक म्हणून अन्नपूर्णा घोष यांची ही पहिलीच फिचर फिल्म आहे. त्यांचा लघुपट २०१८ मध्ये प्रतिष्ठित कान फिल्म फेस्टिव्हलसाठी निवडला गेला होता.

या चित्रपटाचे शूटिंग या वर्षाच्या सुरूवातीलाच सुरू झाले होते, परंतु कोरोना व्हायरसच्या साथीमुळे ते पुढे ढकलले गेले. या टीमने २३ नोव्हेंबरला कोलकाता येथे दुसर्‍या शेड्यूलनंतर शुटींग सुरू केले आणि ९ डिसेंबर रोजी पूर्ण झाले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांची काळजी घेण्यात आली होती.

रेड चिलीज एन्टरटेन्मेंटने सोशल मीडियावर याबद्दल लिहिले आहे की, "बॉब बिस्वास' या एका खास चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. लवकरच भेटू."

हेही वाचा - आयुष शर्माने दाखवला 'अंतिम .. द फाइनल ट्रथ'मधील सलमानचा फर्स्ट लूक

या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, सुजॉय घोष आणि गौरव वर्मा यांनी केली आहे. हा चित्रपट बाउंड स्क्रिप्ट प्रॉडक्शन आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटद्वारे तयार केला जात आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - नीतू कपूर यांना कोरोनाची बाधा, पोस्ट लिहून दिला दुजोरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.