मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत रणबीर कपूरचा प्रवास रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी नाही. त्याच्या ऑफ-स्क्रीन व्यक्तिमत्त्वाने लव्हर बॉयच्या प्रतिमेमध्ये खूप भर घातली आहे. त्याची ही प्रतिमा बदलण्यासाठी तो आगामी काळात प्रयत्नशील होणार असल्याचे दिसत आहे. यासाठी तो संधी शोधत आहे.
रणबीर कपूर हा आपल्या पिढीतील एक उत्तम अभिनेता असला तरी रणबीरला 'बेशरम', 'रॉय' आणि 'बॉम्बे वेलवेट' यासारखे फ्लॉप चित्रपट त्याच्या खात्यात जमा आहेत. प्रेक्षकांची मने जिंकण्यात तो कमी पडला असल्याचे त्याच्या चित्रपटांच्या निवडीवरुन लक्षात येते.
रणबीर आणि दीपिकाचा 'तमाशा' या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र बॉक्सऑफिसवरील खराब कामगिरीमुळे या अपेक्षाही फोल ठरल्या होत्या.
चित्रपट निर्मात्यांनी असे सुचवले आहे की, रणबीरला आपल्या कारकीर्दीत पुनरुज्जीवन करायचे असेल तर, त्याने आपले चित्रपट काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. पण रणबीरने ग्लिट्ज आणि ग्लॅमरच्या वास्तविक बाजूकडे बारकाईने पाहिले आहे आणि तो म्हणाला की, चित्रपटसृष्टीत यशाचे कोणतेही स्रोत नाही आणि हे अपयश अपरिहार्य आहे.
रणबीर कपूरच्या रक्तातच सिनेमा आहे. रणबीर त्याच्या पात्रांना न्याय देतो, हे नाकारता येत नाही. पण कधीकधी कथा त्याला निराश करते. 'जग्गा जासूस' या २०१७ साली आलेल्या चित्रपटाचा तो सहनिर्माता बनला. पण त्याचीही किंमत त्याला मोजावी लागली.
जग्गा जासूस चित्रपट अपयशी ठरल्यानंतर लोक विचार करू लागले की, रणबीर कपूर संपला आहे. परंतु फिनिक्स पक्षाप्रमाणे तो पुन्हा उभा राहिला आणि संजू या चित्रपटातून त्याने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कमाल केली.
राजकुमार हिरानीचा संजू हा चित्रपट २०१८ मधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. या चित्रपटातून रणबीरने आपली प्रतिभा पुन्हा एकदा सिद्ध केली. रणबीरचा आगामी 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण चित्रपट ठरणार आहे.