'भूल भुलैय्या' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल आता निर्माणाधीन आहे. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा पुढील भाग पुढील वर्षी ३१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल. 'भूल भुलैय्या - २' मध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असतील.
-
#BhoolBhulaiyaa2 filming begins... Stars Kartik Aaryan and Kiara Advani... Directed by Anees Bazmee... Produced by Bhushan Kumar, Murad Khetani and Krishan Kumar... 31 July 2020 release. pic.twitter.com/yVcpnEx4kS
— taran adarsh (@taran_adarsh) October 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#BhoolBhulaiyaa2 filming begins... Stars Kartik Aaryan and Kiara Advani... Directed by Anees Bazmee... Produced by Bhushan Kumar, Murad Khetani and Krishan Kumar... 31 July 2020 release. pic.twitter.com/yVcpnEx4kS
— taran adarsh (@taran_adarsh) October 9, 2019#BhoolBhulaiyaa2 filming begins... Stars Kartik Aaryan and Kiara Advani... Directed by Anees Bazmee... Produced by Bhushan Kumar, Murad Khetani and Krishan Kumar... 31 July 2020 release. pic.twitter.com/yVcpnEx4kS
— taran adarsh (@taran_adarsh) October 9, 2019
'भूल भुलैय्या -२' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बाझ्मी करीत आहेत. या चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्याची माहिती ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सेटवरचे फोटो शेअर करीत दिली आहे. भूषण कुमार, मुराद केतानी आणि कृष्ण कुमार या सीक्लचे निर्माते आहेत.
'भूल भुलैय्या' या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. शाइनी आहूजा, अक्षय कुमार, विद्या बालन आणि अमीशा पटेल यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे निर्मातेही भूषण कुमार होते.
'भूल भुलैय्या -२' हा सायकॉलॉजिकल थ्रिलर असेल. अनैसर्गिक शक्ती आणि मानसिक दुर्बलता यांचा विज्ञानाच्या कसोटीवर शोध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून होईल. हा एक मनोरंजक चित्रपट असेल अशी अपेक्षा सध्या तरी आपण बाळगू शकतो.