मुंबई - दिल्लीच्या 'बाटला हाऊस' चकमक प्रकरणावर आधारित 'बाटला हाऊस' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून जॉन अब्राहम बाटला हाऊस चकमकीचं सत्य पडद्यावर मांडणार आहे. शनिवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासाठी चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं गेलं.
दिल्लीत हे स्क्रिनिंग पार पडलं. नायडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबतचा आपला फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली. अभिनेता जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर आणि चित्रपट दिग्दर्शक निखिल आडवाणी यांच्यासह बाटला हाऊस चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत माझ्या निवासस्थानी भेट झाली. यावेळी बोलत असताना त्यांनी सांगितलं, की या चित्रपटाचा उद्देश दिल्लीतील बाटला हाऊस घटनेच्या मागील सत्य लोकांसमोर मांडण्याचा आहे. चित्रपटाच्या टीमला माझ्याकडून शुभेच्छा, असं ते ट्विटमध्ये म्हटले.
-
They explained to me that the motivation for the film was to uncover the truth of the incident that took place 11 years ago in the Batla House area in Delhi. My best wishes to the entire team. @BatlaHouseFilm @TheJohnAbraham @mrunal0801 @nikkhiladvani #BatlaHouse pic.twitter.com/k3qhC1CI3o
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">They explained to me that the motivation for the film was to uncover the truth of the incident that took place 11 years ago in the Batla House area in Delhi. My best wishes to the entire team. @BatlaHouseFilm @TheJohnAbraham @mrunal0801 @nikkhiladvani #BatlaHouse pic.twitter.com/k3qhC1CI3o
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 3, 2019They explained to me that the motivation for the film was to uncover the truth of the incident that took place 11 years ago in the Batla House area in Delhi. My best wishes to the entire team. @BatlaHouseFilm @TheJohnAbraham @mrunal0801 @nikkhiladvani #BatlaHouse pic.twitter.com/k3qhC1CI3o
— VicePresidentOfIndia (@VPSecretariat) August 3, 2019
तर नायडूंच्या या ट्विटवर उत्तर देत माननीय उप राष्ट्रपतींना भेटून आनंद झाला. त्यांना आमच्या चित्रपटाची झलक यावेळी दाखवली, असं जॉननं म्हटलं. दरम्यान हा सिनेमा स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयच्या 'मिशन मंगल' चित्रपटासोबत बाटला हाऊसचा बॉक्स ऑफिस क्लॅश पाहायला मिळणार आहे,