मुंबई - दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला 'बाटला हाऊस' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या घटनेवर अनेक वेगवेगळ्या कथा रचल्या गेल्या. मात्र, यामागची खरी कथा अकरा वर्षांनंतर आम्ही तुमच्यासमोर मांडणारं आहोत, असं या टीझरमध्ये म्हटलं गेलं आहे.
त्या दिवशी बाटला हाऊसमध्ये नक्की काय झालं? आम्ही चुकीचे होतो? की मी चुकीचा होतो? असे जॉनचे शब्द या टीझरमध्ये ऐकायला मिळतात. या चित्रपटात जॉन अब्राहम पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचे नेतृत्त्व केले होते
-
Sound of the gunshots that were fired still echoes eleven years later. Witness the real story in the #BatlaHouseTrailerOn10thJuly https://t.co/noxT8f9FwT …#BatlaHouse @mrunal0801 @nikkhiladvani @writish @TSeries @EmmayEntertain @johnabrahament @bakemycakefilms @panoramamovies
— Komal Nahta (@KomalNahta) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sound of the gunshots that were fired still echoes eleven years later. Witness the real story in the #BatlaHouseTrailerOn10thJuly https://t.co/noxT8f9FwT …#BatlaHouse @mrunal0801 @nikkhiladvani @writish @TSeries @EmmayEntertain @johnabrahament @bakemycakefilms @panoramamovies
— Komal Nahta (@KomalNahta) July 6, 2019Sound of the gunshots that were fired still echoes eleven years later. Witness the real story in the #BatlaHouseTrailerOn10thJuly https://t.co/noxT8f9FwT …#BatlaHouse @mrunal0801 @nikkhiladvani @writish @TSeries @EmmayEntertain @johnabrahament @bakemycakefilms @panoramamovies
— Komal Nahta (@KomalNahta) July 6, 2019
काय आहे बाटला हाऊस प्रकरण -
दक्षिण दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे १९ सप्टेंबर २००८ रोजी सकाळी ११ वाजता दिल्ली पोलिसांचा विशेष चमू आणि इंडियन मुजाहिदीनचे चार दहशतवादी यांच्यात चकमक झाली. दोन तासांच्या धुमश्चक्रीत आतिफ अमिन आणि महम्मद साजिद हे दहशतवादी ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना वीरमरण आले. याच घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. या सर्वादरम्यान विवादात अडकलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आणि त्या रात्रीची खरी बाजू या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.