मुंबई - लंडनमध्ये फिल्म मेकिंगचा अभ्यास करणार्या अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने आता फिल्म स्कूल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नवोदित अभिनेता असलेल्या बाबिलने असा खुलासा केला आहे की त्याची आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याची इच्छा आहे. अनुष्का शर्माच्या आगामी 'नेटफ्लिक्स'नरील 'काला' या चित्रपटातून तो आपल्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास सुरू करणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बाबिलने दोन फोटोंचा सेट शेअर केला आहे. ज्यामध्ये तो खांद्यावर फिल्म कॅमेरा घेऊन शूटिंगच्या कामात गुंतलेला दिसतो. या नवशिक्या अभिनेत्याने यूकेच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातील आपल्या मित्रांची आठवण ठेवणारी भावनिक पोस्ट लिहिलेली आहे. मुंबईत त्याचे खूप कमी मित्र आहेत, असंही बाबिल याने म्हटलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फिल्म बीए सोडण्याच्या निर्णयाची घोषणा करताना बाबिलने लिहिले की, "मला तुझी खूप आठवण येईल. माझ्या सुंदर मित्रांनो. माझे इथे मुंबईत एक अगदी टाईट सर्कल आहे, अवघे २-३ च मित्र आहेत. तुम्ही सर्वांनी मला या थंड जागी घर दिले तुम्ही माझे अससल्याचे दाखवून दिलेत. यसाठी तुमचे आभार आणि प्रेम. फिल्म बीए आज सोडत आहे, 120 हून अधिक क्रेडिट् मी हे सर्व आताच्या भूमिकेसाठी देत आहे. वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीला गुडबाय. माझ्या विश्वासू मित्रांवर माझे खूप प्रेम आहे."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'काला' या चित्रपटाशिवाय बाबिलने दिग्दर्शक शुजित सिरकर यांच्याबरोबर आपल्या पुढच्या चित्रपटासाठी कामही सुरू केले आहे. अद्याप शीर्षक न ठरलेल्या या चित्रपटात दिग्दर्शक मन्सूर खानची मुलगी झेन खानदेखील भूमिका साकारणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाच - 'रश्मिका'साठी फॅनची 900 किमी वारी: भेटी लागे जीवा 'मंदाना'ची आस, 'रश्मिका'साठी कायपण..!!