मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या मूळ गावी चंदिगडमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मात्र, घरात राहण्याऐवजी तो हॉटेलमध्येच राहतो. अभिषेक कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या आयुष्मानच्या चित्रपटाचे नाव आहे 'चंदिगढ़ करे आशिकी'. या चित्रपटात त्याची वाणी कपूरसोबत जोडी आहे.
तो म्हणाला, ''महामारीच्या काळात सावधगिरी बाळगत आहे आणि या विषाणूच्या तावडीत न सापडण्याचा प्रयत्न परिवारासह मी स्वतः करीत आहे. माझ्यामुळे माझी पत्नी आणि मुलांवर संकट येऊ नये याची काळजी घेत आहे. चंदिगडमध्ये माझे आई-वडील राहतात, त्यांच्याही सुरक्षततेचा मी विचार केलाय. इंडस्ट्री पूर्ववत होण्यासाठी मी माझे योगदान देत आहे. सोबतच मी कुटुंबाचीही काळजी घेतोय.''
अभिनेता आयुष्यमान आपल्या चित्रपटाच्या संपूर्ण प्रॉडक्शन टीमसमवेत हॉटेलमध्ये थांबला आहे.