ETV Bharat / sitara

अर्जुन रामपालने कुटुंबासह एन्जॉय केली जंगल सफारी

धाकड या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेता अर्जुन रामपाल मध्य प्रदेशमध्ये आला आहे. शुटिंगमधून वेळ मिळताच अर्जुनने आपली साथीदार गॅब्रिएला डेमेट्रिएड्स आणि माहिका, मायरा आणि अरिक या मुलांसह सातपुडा टायगर रिझर्व्हला भेट दिली.

author img

By

Published : Feb 17, 2021, 7:32 PM IST

Arjun Rampal
अर्जुन रामपाल

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आपल्या मुलांसह गर्लफ्रेंड गॅब्रिएला डीमेट्रिएड्ससोबत सातपुडा टायगर रिझर्वमध्ये जंगल सफारीसाठी पोहोचला होता.

अर्जुन रामपालने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या नुकत्याच झालेल्या जंगल सफारी साहसातील लेडीलव्ह गॅब्रिएला डेमेट्रिएड्स, मुलगा अरिक आणि मुली, माहिक्का आणि मायरा यांच्यासह काही आश्चर्यकारक फोटो आणि व्हिडिओ झलक शेअर केल्या आहेत.

अर्जुनने एक सुखद चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. यात तो लिहितो, "काल सातपुडा व्याघ्र प्रकल्पात एक अतिशय भव्य आणि विस्मयकारक दिवस होता. त्याने एका वाघिणीला, एका वाघाला चिकटलेल्या छाव्याला आणि तीन हस्वले पाहिली.''

त्याने पुढे लिहिलंय, "हे भारतातील सर्वात प्राचीन व सर्वात मोठे राखीव जंगल आहे. या प्रांताच्या संरक्षणासाठी व अधिक सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी अभयारण्याच्या आजूबाजूची गावे स्थलांतर करण्याचे विलक्षण काम केले आहे. येथे भेट देण्याची शिफारस केली जाते. धन्यवाद. "

हेही वाचा - लूप लपेटा’मध्ये रोमँटिक शैलीत तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.