मुंबई - बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माता अशी ओळख असलेल्या अनुभव सिन्हा यांनी आगामी चित्रपटासाठी दिग्गज निर्माता दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
या जोडीचा आगामी चित्रपटाचा विषय अॅक्शन थ्रिलर असणार आहे. याचे दिग्दर्शन हंसल मेहता करतील. या चित्रपटात झहान खान आणि आदित्य रावल हे मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटाच्या शीर्षकची घोषणा लवकरच केली जाणार असून शुटिंगलाही लवकरच सुरूवात केली जाणार आहे.
या आगामी चित्रपटाची निर्मिती अनुभव सिन्हा, भूषण कुमार, साक्षी भट्ट, साहिल सैगल आणि मजहीर मंदसौरवाला हे मिळून करणार आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही बातमी सोशल मीडियावरुन दिली आहे.
-
ANUBHAV SINHA COLLABORATES WITH HANSAL MEHTA... #AnubhavSinha teams up with #HansalMehta for a new film project... #Hansal will direct the action thriller, which stars #ZahaanKapoor and #AdityaRawal in lead roles... Title will be announced soon... Filming has commenced.
— taran adarsh (@taran_adarsh) July 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
contd... pic.twitter.com/LmnZCwCLnX
">ANUBHAV SINHA COLLABORATES WITH HANSAL MEHTA... #AnubhavSinha teams up with #HansalMehta for a new film project... #Hansal will direct the action thriller, which stars #ZahaanKapoor and #AdityaRawal in lead roles... Title will be announced soon... Filming has commenced.
— taran adarsh (@taran_adarsh) July 5, 2021
contd... pic.twitter.com/LmnZCwCLnXANUBHAV SINHA COLLABORATES WITH HANSAL MEHTA... #AnubhavSinha teams up with #HansalMehta for a new film project... #Hansal will direct the action thriller, which stars #ZahaanKapoor and #AdityaRawal in lead roles... Title will be announced soon... Filming has commenced.
— taran adarsh (@taran_adarsh) July 5, 2021
contd... pic.twitter.com/LmnZCwCLnX
कोण आहेत हंसल मेहता?
हंसल मेहता एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि निर्माता आहेत. मेहता यांनी करिअरची सुरूवात (१९९३ ते २०००) 'खाना खजाना' या टीव्ही मालिकेतून केली होती. त्यानंतर त्यांनी... जयते (१९९९) दिल पे मत ले यार (२०००) आणि छल (२००२) सारखे चित्रपट बनवले. ते शाहिद या चित्रपटासाठी परिचित आहेत. २०१३ मध्ये आलेल्या या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी सिटी लाइट्स (२०१४), अलीगढ़ (२०१६) आणि सिमरन (२०१७) हे चित्रपट दिग्दर्शित केले होते.
कोण आहेत अनुभव सिन्हा?
अनुभव सिन्हा एक यशस्वी हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहेत. तुम बिन (२००१) दस (२००५), रा. वन (२०११), मुल्क (२०१८), आर्टिकल 15 (२०१९) आणि थप्पड (२०२०) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
हेही वाचा - ‘भूत पोलिस’पोस्टर रिलीज, 'ओटीटी'वर रिलीजची झाली घोषणा!!