ETV Bharat / sitara

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ'चे ट्रेलर थिएटरमध्ये रिलीज, सलमान खान चाहत्यांसाठी पर्वणी - Salman Khan, Ayush Sharma latest news

हेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चे ट्रेलर नुकत्याच उघडलेल्या मेझॉन (Maison) या चित्रपटगृहामध्ये धुमधडाक्यात अनावरीत झाले. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर आणि गाण्यानंतर, 'अंतिम'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. ज्यात 'अंतिम दुनिया' ची सर्वात मोठी झलक आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान च्या भूमिकेवर भर दिल्याचे जाणवते जेणेकरून अत्याधिक प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहांकडे खेचला जाईल.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ'चे ट्रेलर थिएटरमध्ये रिलीज,

author img

By

Published : Oct 26, 2021, 6:25 PM IST

‘मुळशी पॅटर्न’ चा हिंदी अवतार असलेल्या, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' चे ट्रेलर नुकत्याच उघडलेल्या मेझॉन (Maison) या चित्रपटगृहामध्ये धुमधडाक्यात अनावरीत झाले. नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टर आणि गाण्यानंतर, 'अंतिम'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. ज्यात 'अंतिम दुनिया' ची सर्वात मोठी झलक आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खान च्या भूमिकेवर भर दिल्याचे जाणवते जेणेकरून अत्याधिक प्रेक्षकवर्ग चित्रपटगृहांकडे खेचला जाईल. सलमान खान आणि आयुष शर्माने एकत्र येऊन आपल्या चाहत्यांसाठी ट्रेलरचे अनावरण केले व उपस्थित प्रेक्षकांच्या त्याला जबरदस्त ऊर्जावान प्रतिक्रिया मिळाल्या. ट्रेलरला मुंबईसोबतच इंदौर, गुरुग्राम आणि नागपुर येथे एकाच वेळी रिलीज करण्यात आले..

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटात सलमान खान एका शीख पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे आणि आयुष्य ‘रावल्या’ च्या भूमिकेत. ट्रेलरमध्ये कथेतील पात्रे आणि कथेचे जग उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे. चित्रपटात आपापल्या भूमिका साकारण्यासाठी सलमान आणि आयुष दोघांनाही आपल्या शरीरावर लक्षणीय मेहनत घेतल्याचे जाणून येते आणि ते ट्रेलरमध्ये उत्तमरीतीने दिसून येत आहे. रोमहर्षक ऍक्शन-पॅक ट्रेलरमध्ये, सलमान खान एका डॅशिंग, पोलिसाची भूमिका साकारत आहे जो गुन्हे रोखण्यासाठी काहीही करू शकतो. सलमान कमालीचा उत्साही आणि दृढनिश्चयी दिसत असून त्याला सरदारच्या पोशाखात पाहणे त्याच्या फॅन्ससाठी पर्वणी ठरेल. ट्रेलरमध्ये आयुषच्या व्यक्तिरेखेतील परिवर्तनाची झलकही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील एका निष्पाप तरुण मुलापासून ते सर्वात आक्रमक, भयंकर आणि प्रादेशिक गुंडांपैकी एक असा आयुषचा प्रवास अविश्वसनीय आहे जो चित्रपटात पाहणे मनोरंजक असेल.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ'चे ट्रेलर थिएटरमध्ये रिलीज,
‘अंतिम: द फाइनल ट्रुथ'चे ट्रेलर थिएटरमध्ये रिलीज,

'अंतिम' महिमा मकवानाचा पहिला चित्रपट असून तिने आपल्या प्रफुल्लित अभिनयाने सर्वांनाच चकित केले आहे. 'अंतिम'च्या दिग्दर्शकाच्या खुर्चीत महेश मांजरेकर आपल्या कम्फर्ट झोनमध्ये पूर्णपणे फिट बसले आहेत. या आधी देखील आपण त्यांची दिग्दर्शकीय तंत्रावरची पकड पाहिली आहे आणि आता 'अंतिम'मध्ये पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या रूपात त्यांचे प्रभुत्व और कौशल्य अनुभवणार आहोत. महेश मांजरेकर यांची देखील या चित्रपटात छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका आहे. ट्रेलरमध्ये बैकग्राउंड म्यूजिकची झलक पाहिल्यानंतर, आता याची खात्री आहे की दर्शकांना संपूर्ण चित्रपटादरम्यान चार्टबस्टर म्यूजिक ऐकायला मिळणार आहे.

सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट सलमा खान द्वारे निर्मित आणि सलमान खान फिल्म्स द्वारे प्रस्तुत करण्यात आला आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबरला झी स्टूडियोज द्वारा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - सुष्मिता सेनने देशाला मिळवून दिलेला गौरव माझ्यासाठी प्रेरणास्रोत होता : नवदीप कौर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.