ETV Bharat / sitara

कपूर खानदानातील निखळला अजून एक तारा, चिंटू पाठोपाठ चिंपूनेही घेतला निरोप!

चिंपू कपूर म्हणजेच राजीव कपूर यांची आज प्राणज्योत मावळली. वयाच्या ५८व्या वर्षी प्रखर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे प्राण गेले.

author img

By

Published : Feb 9, 2021, 3:33 PM IST

another-star-of-kapoor-dynasty-
कपूर खानदानातील निखळला अजून एक तारा

मुंबई - कपूर खानदान भारतीय चित्रपटसुष्टीतील सन्माननीय कुटुंब समजले जाते, ज्यांची चवथी पिढी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. गेल्यावर्षी या खानदानातील एक तळपता सितारा निखळला होता व आज अजून एक कपूर-तारा निखळला आहे. चिंपू कपूर म्हणजेच राजीव कपूर यांची आज प्राणज्योत मावळली. वयाच्या ५८व्या वर्षी प्रखर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे प्राण घेतले. चेंबूरच्या घरी त्याला आज सकाळी छातीत दुखू लागल्यामुळे जवळच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व काही वेळाने तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली.

Rajiv Kapoor passes away
नीतू पूर यांनी बातमीला दुजोरा दिला
चिंटू उर्फ ऋषी कपूर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत अवकळा पसरली होती. त्यांचे निधन लॉकडाऊन सुरु असताना झाले होते म्हणून त्यांचे शव थेट स्मशानभूमीत नेण्यात आले होते. अंतयात्रा काढू न शकल्यामुळे कोणालाही त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नव्हते. चिंटू आणि चिंपू यांचा वडीलधारे भाऊ डब्बू कपूर म्हणजेच रणधीर कपूर याच्यावर आपल्या लहान भावांच्या मृत्यूनंतर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानेच राजीव कपूरच्या निधनाची बातमी कळविली.राजीव कपूर हे राज कपूर यांचा सर्वांत लहान मुलगा. शेंडेफळ असल्यामुळे भरपूर लाडात वाढलेला. कपूर परंपरेप्रमाणे त्यालाही राज कपूरच्या दिग्दर्शनाखाली ‘राम तेरी गंगा मैली’ मधून अभिनय पदार्पणाची संधी मिळाली. मंदाकिनी सोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीची भरपूर चर्चा झाली व चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. त्यानंतर लाव्हा, लव्हर बॉय, झलझला, नाग नागीन सारख्या डझनभर चित्रपटांतून त्याने अभिनय केला. नंतर तो प्रोड्युसर म्हणून कार्यरत होता व ‘प्रेम ग्रंथ’ या ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते.चिंपू कपूर उर्फ राजीव कपूर च्या निधनाने कपूर कुटुंबियांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली असून त्यांच्यासाठी चित्रपटसृष्टीतून ‘कोन्डोलन्स मेसेजेस’ येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.