ETV Bharat / sitara

कंगना रणौतच्या विरोधात आणखी एक तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण

author img

By

Published : Dec 31, 2021, 4:58 PM IST

देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असल्याचे भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यावेळी अभिनेत्रीविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत

मुंबई - रक्त आणि घाम गाळून देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक असल्याचे भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून अजूनही वाद सुरूच आहे. याप्रकरणी कंगनाच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगनाच्या विरोधात ही तक्रार काँग्रेसचे सरचिटणीस भरत सिंह यांनी 28 डिसेंबर रोजी मुंबईत केली आहे. आशिष राय आणि अंकित उपाध्याय या वकिलांच्या माध्यमातून विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे तक्रार?

कंगनाच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कंगनाचे हे बेजबाबदार विधान टीव्हीच्या माध्यमातून जगभर गाजले. अभिनेत्रीच्या या विधानामुळे भारतीय नागरिक, महान माजी स्वातंत्र्यसैनिक, नायक आणि माजी नेत्यांच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेला आणि सन्मानाला धक्का पोहोचला आहे. तिचं हे विधान देशाच्या विरोधात आहे तसेच देशात दंगली आणि दहशतवाद भडकवणारं आहे. आता या तक्रारीनंतर पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे.

कंगना रणौतच्या विरोधात आणखी एक तक्रार
कंगना रणौतच्या विरोधात आणखी एक तक्रार

कंगना विरोधात संतापाची लाट

नुकतेच एका टीव्ही चर्चेत पोहोचलेल्या कंगना रणौतने 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक मागून मिळालेले स्वातंत्र्य आहे आणि खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे सांगून वाद ओढवून घेतला होता. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली होती.

पद्मश्री परत घेण्याची मागणी

कंगनाच्या या धक्कादायक वक्तव्यानंतर तिच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याचबरोबर अभिनेत्रीला 2020 साठी मिळालेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्याची मागणी करण्यात आली. कंगनाच्या या वक्तव्याने दुखावलेल्या लोकांनी रस्त्यावर येऊन तिचे पुतळे जाळण्यास सुरुवात केली.

कंगनाचे वर्कफ्रंट

सध्या कंगना रनौत सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या भूमिका असलेल्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. कंगनाच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. अभिनेत्री कंगनाने सोशल मीडियावर चित्रपटाशी संबंधित अनेक फोटोही शेअर केले आहेत.

कंगनाचे आगामी चित्रपट

कंगना लवकरच 'धाकड', 'तेजस' आणि 'मणिकर्णिका रिटर्न्स' यांसारख्या चित्रपटातून झळकणार आहे.

हेही वाचा - सलमान खानच्या चित्रपटांचे निर्माते विजय गलानी यांचे ब्लड कॅन्सरने लंडनमध्ये निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.