मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने महिलांसाठीच्या फॅशन आणि मनोरंजन मॅगझिनच्या कव्हरपेजची शोभा वाढवली. रविवारी एक जबरदस्त कव्हरपेज शेअर केल्यानंतर अनन्याने तिच्या मॅगझिनच्या फोटोशूटमधील आणखी काही फोटो शेअर केले आहेत.
सोमवारी सकाळी अनन्याने एका छान नोटवर आठवड्याची सुरुवात केली. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर मासिकाच्या शूटमधील अनेक सुंदर फोटो शेअर केले. अनन्याने फोटोच्या कॅप्शनला शीर्षक दिलंय, ''फक्त मी आणि टारझन द वंडर कार.@ कॉस्मोइंडिया.😎🚗."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनन्याच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. लाल ह्रदय आणि फायर इमोजींनी तिचे पेज भरलेले आहे. तिच्या फोटोंचे, सौंदर्याचे भरपूर कौतुक केले जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
फिल्मी आघाडीवर अनन्या आगामी लायगर या चित्रपटामध्ये तेलुगु हार्टथ्रोब विजय देवरकोंडासमोर झळकणार आहे. तसेत ती शकुन बत्रा दिग्दर्शित आगामी सिनेमात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत काम करीत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">