मुंबई - कोरोना महामारीच्या काळात शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यालाही महत्व प्राप्त झाले आहे. म्हणजे ते महत्व नेहमीच होतं, परंतु या लॉकडाऊनमधील रिकाम्या वेळात त्याचे मोल कळत आहे. या महामारीमुळे जगाची, आणि अर्थातच देशाची, आर्थिक घडी विस्कटली. अनेक व्यवसाय संकटात सापडले, काही तर बंद पडले. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांच्या टिकल्या त्यांना कमी पगारात काम करावे लागतेय. सतत घरातच राहिल्यामुळे जोडप्यांमध्ये वितुष्ट येऊ लागले आणि लहान मुलांना खेळायला न मिळाल्यामुळे त्यांची चिडचिड होऊ लागली. अशा एक ना अनेक समस्यांमुळे लोकांचे मानसिक आरोग्य घायकुतीला आलेय. त्यातच कोरोना होऊ न देण्याचे टेन्शन. या सगळ्यामुळे अनेकांना मानसिक आजार जडले. परंतु या सर्वावर शारीरिक आणि मानसिक व्यायाम करणे हा उपाय आहे. खासकरून मानसिक व्यायाम, ज्यासाठी भारतीय योगा सर्वोत्तम आहे. अनेक सेलिब्रिटीजसुद्धा योग करण्याचे सुचवत असतात, त्यातीलच एक आहे मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीत लीलया वावरणारी अमृता खानविलकर.
मानसिक आरोग्यासाठी अमृता खानविलकरचा योगाभ्यावर आहे विश्वास! - सेलिब्रिटी
या कोरोना काळात अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांना योगासाधनेचे महत्व सांगत आहे. नुकतेच तिने सेथल मिडीयावर आपले फोटोज शेयर केले.