ETV Bharat / sitara

बिग बी शुटिंगसाठी पुन्हा सज्ज, 'या' चित्रपटाचे सुरू करणार शुटिंग - अमिताभ बच्चन

कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रातील फिल्म आणि टीव्ही मालिकांचे शुटिंग थांबवण्यात आले होते. आता कोविड प्रोटोकॉलसह बायो बबलमध्ये शुटिंग पुन्हा सुरू होत आहे. अमिताभ बच्चनही त्यांच्या आगामी गुडबाय चित्रपटाचे शुटिंग सुरू करणार असल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

Big B
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Jun 9, 2021, 4:56 PM IST

मुंबई - महाराष्ट्र सरकारने चित्रपट आणि टीव्ही उद्योगाला कोविड -१९ प्रोटोकॉलद्वारे त्यांचे निर्मिती कार्य पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर अनेक निर्मात्यांनी शुटिंगची तयारी सुरू केली आहे. बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही आपल्या पुढील चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले.

५ जून रोजी सरकारने जारी केलेल्या अनलॉक उपाययोजनांचा एक भाग म्हणून, सर्व आवश्यक कोविड -१९ सुरक्षा नियमांमध्ये करमणूक उद्योगास बायो बबलमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शूटिंग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोविड -१९ रुग्णांची संख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुंबईत संध्याकाळपर्यंत चित्रपटाच्या शुटिंगलाही परवानगी देण्यात आल्यामुळे काही दिवसांतच पुन्हा काम सुरू करणार असल्याचा खुलासा बच्चन यांनी केला.

“काही आवश्यक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत ... बार, पार्लर, रेस्टॉरंट्स ५० टक्के उघडण्यात येणार असून चित्रपटाचे काम ... फक्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत केले जाणार आहे... त्यामुळे लवकरच शुटिंगचे वेळापत्रक तयार होत आहे. काही दिवसातच स्टुडिओ सुरू होतील,'' असेही बच्चन यांनी म्हटलंय.

अमिताभ बच्चन सांगितले की, त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाच्या संपूर्ण क्रूला लस देण्यात आली आहे आणि टीमकडून अत्यंत खबरदारी घेतली जात आहे. "माझे स्वत: चे संपूर्ण शूटिंग युनिट, जे काही दिवसांत माझ्या गुडबाय चित्रपटासाठी काम करणार आहे, त्या सर्वांचे या प्रॉडक्शनने लसीकरण केले आहे आणि अत्यंत दक्षपणे खबरदारी घेतली जात आहे.", असेही बच्चन यांनी लिहिलंय.

विकास बहल-दिग्दर्शित ‘गुडबाय’ हा चित्रपट २ एप्रिल रोजी शुटिंग फ्लोअरवर गेला होता. परंतु कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेनंतप शुटिंग थांबवण्यात आले होते. बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्यावतीने बनत असलेल्या या चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा - ‘बाळकडू’ची निर्माती स्वप्ना पाटकरला ‘चीटिंग’साठी झाली अटक!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.