नवी दिल्ली : अभिनेत्री आलिया भटला कोरोनाची लागण झाली आहे. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. सध्या तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
"माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी आवश्यक ती काळजी घेत आहे. तुम्ही सर्व देत असलेल्या प्रेमासाठी आणि आधारासाठी धन्यवाद. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा" अशा आशयाची पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केली होती.
गेल्या काही दिवसांमध्ये परेश रावल, कार्तिक आर्यन, रणबीर कपूर, रोहित सराफ आणि बप्पी लेहरी अशा सेलिब्रिटिंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सेलिब्रिटी कोरोनातून बरे झाले आहेत.
हेही वाचा : खासदार किरण खेर यांना रक्ताचा कॅन्सर, अनुपम खेर यांनी दिला बातमीला दुजोरा