कबीर बेदी यांची नात आणि पूजा बेदीची मुलगी अलाया एफ (म्हणजे अलाया फर्निचरवाला) ने सैफ अली खान आणि तब्बू यांच्यासोबत आपला पहिला चित्रपट, 'जवानी जानेमन' मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. दिग्गज कलाकारांसमोर डगमगून न जाता अलायाने उत्तम अभिनय करीत आपली योग्यता सिद्ध केली आणि सर्वांची मनेदेखील जिंकली आहेत. या युवा कलाकाराचे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही सारखेच कौतुक केले. खरंतर तिचा पदर्पणीय 'जवानी जानेमन' २०२० साली प्रदर्शित झाला होता आणि त्यानंतर लगेचच कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागला आणि सिनेसृष्टी जवळपास बंद पडली होती.
![अलाया एफ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-alayaf-starts-shoot-of-freddy-mhc10001_26082021005542_2608f_1629919542_140.jpeg)
परंतु तिच्या अभिनयाची कीर्ती चित्रपटसृष्टीत पसरल्यामुळे तिला बरेच चित्रपट ऑफर झाले. त्यातील ती ३ चित्रपट करीत आहे. अलायाकडे असणाऱ्या अनेक प्रकल्पांमुळे अलाया मागील काही महिन्यांपासून प्रचंड व्यस्त असून आपल्या वर्क कमिटमेंट्ससोबत २४ तास चित्रीकरणात व्यस्त आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अलाया त्या तिन्ही प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त असून आपल्या आधी केलेल्या ब्रॅंड कॅम्पेनच्या कमिटमेंट्ससाठी देखील आपल्या व्यस्त दिनाक्रमातून वेळ काढत आहे.
![अलाया एफ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-alayaf-starts-shoot-of-freddy-mhc10001_26082021005542_2608f_1629919542_291.jpeg)
सूत्रांनी पुढे सांगितले की, "अलायाने चंदिगढमध्ये 'यू टर्न'चे जवळपास ४५ दिवसांचे चित्रीकरण शेड्यूल नुकतेच पूर्ण केले असून, मुंबईत येऊन लगेचच 'फ्रेडी'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यासोबतच, ही युवा अभिनेत्री अनुराग बसु यांच्या आगामी चित्रपटात देखील काम करत असून त्याबद्दलची अधिक माहिती अजून गुलदस्त्यात आहे.”
![अलाया एफ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-alayaf-starts-shoot-of-freddy-mhc10001_26082021005542_2608f_1629919542_364.jpeg)
अलायाकडे ३ महत्त्वाचे चित्रपट असून ती सध्या कार्तिक आर्यनसोबत, एकता कपूरच्या 'फ्रेडी'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. बालाजी टेलीफिल्म्सद्वारे निर्मित 'यू टर्न' हा आगामी चित्रपट तसेच, अनुराग बसु यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात देखील ती असणार आहे.
हेही वाचा - अभिषेक बच्चनवर यशस्वी शस्त्रक्रिया, म्हणतो, 'मर्द को दर्द नही होता!'