अक्षय कुमार एक असा अभिनेता आहे जो बहुतेक चित्रपट स्टार्ट-टू-फिनिश शूट करण्यास प्राधान्य देतो. गेल्यावर्षी झालेल्या कोरोना हल्ल्यामुळे मनोरंजनसृष्टी विकलांग झाली होती. चित्रपटगृहे तर बंद होतीच परंतु लॉकडाऊन मुळे सर्व प्रकारच्या शूटिंग्सवर बंदी घालण्यात आली होती. संपूर्ण जगच कोरोनाच्या विळख्यात होतं आणि जगात कुठेही चित्रपटांची चित्रीकरणं होतं नव्हती. जेव्हा कोरोना थोडाफार आटोक्यात आला असे वाटल्यामुळे शासनाने काही निर्बंध शिथिल केले ज्यात चित्रीकरणांना परवानगी देण्यात आली होती, अर्थातच सर्व कोरोना नियम पाळून. काही मालिकांची चित्रीकरणं सुरु झाली होती परंतु अक्षय कुमार पहिला सुपरस्टार होता ज्याने ‘बेलबॉटम’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला हो म्हटले.
‘किती दिवस घाबरत जगायचे? काम तर करायलाच हवे कारण एका चित्रपटावर अनेक कुटुंबांचे भवितव्य अवलंबून असते. आम्ही बेलबॉटम च्या चित्रीकरणासाठी विलायतेत चालतो आहोत आणि सर्व काळजी घेऊन शूटिंग करणार आहोत’, अशा आशयाची पोस्ट त्याने शेयर केली होती. खरंतर ‘बेलबॉटम’ ही जगातील पहिली फिल्म होती जिचे शूटिंग कोरोना महामारीच्या कालखंडात सुरु होऊन पूर्ण देखील झाले. ब्रिटनच्या कायद्यांप्रमाणे ‘बेलबॉटम’ ची संपूर्ण टीम १४ दिवस विलगीकरणात राहिली आणि नंतरच शूटिंगला सुरुवात करण्यात आली. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये नॉन-स्टॉप शूटिंग सुरु करून सप्टेंबरच्या शेवटाला हे स्टार्ट-टू-फिनिश शूट संपन्न झाले. अक्षयने सर्व युनिटचे जाहीर आभार मानले.
-
AKSHAY KUMAR: 'BELL BOTTOM' TO RELEASE IN 3D... #BellBottom - starring #AkshayKumar as a #RAW agent - will release in #3D... Arrives in *cinemas* on [Thursday] 19 Aug 2021... Directed by Ranjit M Tewari. #PoojaEntertainment pic.twitter.com/nBgAfaiZhA
— taran adarsh (@taran_adarsh) August 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AKSHAY KUMAR: 'BELL BOTTOM' TO RELEASE IN 3D... #BellBottom - starring #AkshayKumar as a #RAW agent - will release in #3D... Arrives in *cinemas* on [Thursday] 19 Aug 2021... Directed by Ranjit M Tewari. #PoojaEntertainment pic.twitter.com/nBgAfaiZhA
— taran adarsh (@taran_adarsh) August 2, 2021AKSHAY KUMAR: 'BELL BOTTOM' TO RELEASE IN 3D... #BellBottom - starring #AkshayKumar as a #RAW agent - will release in #3D... Arrives in *cinemas* on [Thursday] 19 Aug 2021... Directed by Ranjit M Tewari. #PoojaEntertainment pic.twitter.com/nBgAfaiZhA
— taran adarsh (@taran_adarsh) August 2, 2021
सेटवर सर्व प्रकारची सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली होती आणि सर्वजण मेहनत घेताना दिसत होते. अक्षय कुमार रविवारी शूटिंग करीत नाही परंतु कोरोना काळ लक्षात घेता आणि हाती असलेला वेळ पाहता त्याने पहिल्यांदाच आठवड्याचे सातही शूटिंग करण्यास प्राध्यान्य दिलं जेणेकरून लवकरात लवकर चित्रपट पूर्ण व्हावा कारण परदेशात शूटिंग करणं जास्त खर्चिक असतं. सुरुवातीला २ एप्रिल २०२१ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु ती तारीख पुढे ढकलून २७ जुलै अशी ठरविण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्याही वेळापत्रकात बदल होऊन आता ‘बेलबॉटम’ स्वातंत्र्यदिनाच्या आसपास १९ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे प्रोमोशन जोरदारपणे सुरु झाले आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे ट्रेलर लाँच. हा सोहळा दिल्लीत संपन्न होतं असून ‘बेलबॉटम’ चित्रपटाचे निर्माते भाऊ-बहीण जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख आणि हिरो-हिरॉईन अक्षय कुमार आणि वाणी कपूर दिल्लीला रवाना झाले. त्यांच्यासोबत चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत असलेली लारा दत्ताही गेली आहे. अक्षय सोबत त्याची पत्नी ट्विंकल खन्ना, मुलगा आरव आणि मुलगी नितारा आहेत.
अजूनही महत्वाचे म्हणजे हा सोहळा दिल्लीतील चित्रपटगृहात होणार असून दिल्लीतील चित्रपटगृहे सुरु झाल्याचे घोषित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अजूनही चित्रपटगृहे सुरु होण्याच्या हालचाली दिसत नाहीयेत म्हणूनच ‘बेलबॉटम’ ची प्रदर्शन तारीख अजून पुढे जाऊ नये अशी अपेक्षा निर्माते व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा - आमिर खान विरुध्द अल्लू अर्जुन : यंदाच्या ख्रिसमसला बॉक्स ऑफिसवर टक्कर