मुंबई (महाराष्ट्र) - सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ चित्रपट निर्माता अली अब्बास जफर दिग्दर्शित अॅक्शनर बडेमियाँ छोटे मियाँ चित्रपटामध्ये काम करणार आहेत. वाशू भगनानी निर्मित हा चित्रपट अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या 1998 मध्ये आलेल्या बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाचा फॉलोअप आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते.
नवीन चित्रपट अॅक्शन फ्रँचायझी सुरू करेल. 2023 च्या ख्रिसमसला - हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम - पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. याची निर्मिती वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि जफर यांनी चित्रपटाचे लेखनही केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
निर्माते वाशू भगनानी म्हणाले की, “नवीन पिढीच्या प्रेक्षकांसमोर हा चित्रपट सादर करण्यास मी उत्सुक आहे. हा माझ्या हृदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे कारण याने अमितजी आणि गोविंदा या दोन दिग्गजांना एकत्र आणले होते आणि माझ्या आवडत्या डेव्हिडजींनी त्याचे दिग्दर्शन केले होते. अली अब्बास जफर यांच्यासोबत छोटे मियाँ जॅकीसह ही जादू पुन्हा तयार करताना पाहणे खूप आनंददायी आहे. "
“अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे आमचे नवे बडे मियाँ आणि छोटे मियाँ या नव्या पिढीच्या प्रेक्षकांसाठी २०२३ मध्ये असल्याने मी खूप नम्र आहे,” असे निर्मात्याने एका निवेदनात म्हटले आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे पहिल्यांदा एकत्र येणार आहे. अक्षय कुमारने ट्विटरवर याची घोषणा केली. त्याने टायगरला उद्देशून लिहिले, "ज्या वर्षी तू या जगात पदार्पण केले, त्याच वर्षी मी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. फिर भी मुकाबला करोगे छोटे मियाँ? चल फिर हो जाए फुल-ऑन अॅक्शन! ख्रिसमस 2023."
टायगर श्रॉफने पोस्टमध्ये लिहिलंय की, "डबल अॅक्शन, डबल धमाका!! रेडी बडे अक्षय कुमार तो खिलाडियो की तरह दिखे हिरोपंती? तुमच्या सर्वांसमोर सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहे, आतापर्यंतचा सर्वात मोठा अॅक्शन मनोरंजन.''
बडेमियाँ छोटे मियाँ हा वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंट जफरच्या AAZ फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने सादर करणार आहेत.
हेही वाचा - Jhund Teaser : उत्सुकता शिगेला पोहोचवणारा 'झुंड'चा टीझर रिलीज