ETV Bharat / sitara

अक्षय कुमारची कोविड टेस्ट निगेटीव्ह, ट्विंकल म्हणाली, "ऑल इज वेल"

author img

By

Published : Apr 12, 2021, 6:56 PM IST

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार कोरोना व्हायरसपासून बरा झाला आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर बातमी शेअर केली आणि तो घरी परतला असल्याचे लिहिले.

Akshay Kumar tests negative for COVID-19
अक्षय कुमारची कोविड टेस्ट निगेटीव्ह

मुंबई - सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने सोमवारी अभिनेता अक्षय कोरोना व्हायरसपासून मुक्त झाल्याचे चाहत्यांना कळवले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर अक्षय रुग्णालयात दाखल झाला होता.

ट्विंकलने इंस्टाग्रामवर स्वत:चे 'द सिम्पसन्स' म्हणून एक विनोदी व्यंगचित्र पोस्ट केले. अक्षयचे हेल्थ अपडेट करताना ट्विंकलने लिहिले, "सुरक्षित आणि निरोगी होऊन तो परतला आहे. ऑल इज वेल," असे तिने लिहिलंय.

अक्षयची ४ एप्रिलला कोरोना व्हायरससाठीची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याचे निदान झाल्यानंतर एका दिवसात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्षीय अक्षयने आपल्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली होती आणि आपल्या चाहत्यांना माहिती दिली होती की तो 'सावधगिरीचा उपाय' म्हणून रूग्णालयात दाखल झाला आहे.

कोविड -१९ ची टेस्ट पॉझिटिव्हची येण्यापूर्वी अक्षय त्याच्या आगामी राम राम सेतु या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. त्याच्यासोबत या चित्रपटाच्या सेटमधील ४५ क्रू मेंबर्सची कोविड टेस्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर शूट थांबविण्यात आले आहे.

हेही वाचा - ‘कमांडो ४’सह फ्रँचायझीला नव्या उंचीवर नेऊ - विपुल शाह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.