ETV Bharat / sitara

'सेल्फी'च्या शूटिंगसाठी अक्षय कुमार भोपाळमध्ये दाखल - चित्र भारती महोत्सवात अक्षय कुमार

बच्चन पांडेच्या रिलीजनंतर अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. यासाठी तो भोपाळमध्ये दाखल झाला आहे. जेव्हा अक्षय विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याच्या उत्साही चाहत्यांनी सुपरस्टारला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

अक्षय कुमार
अक्षय कुमार
author img

By

Published : Mar 21, 2022, 12:01 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार भोपाळ, मध्य प्रदेश येथे पोहोचला आहे जिथे तो त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. ४५ दिवसांच्या शूटसाठी चित्रपटाची टीम भोपाळमध्ये असेल. जेव्हा अक्षय विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याच्या उत्साही चाहत्यांनी सुपरस्टारला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बच्चन पांडे' चित्रपटानंतर अक्षयने 'सेल्फी'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे ज्यामध्ये इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

भोपाळमध्ये 25 मार्चपासून बिशनखेडी येथील माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठात होणाऱ्या चित्र भारती चित्रपट महोत्सवात अक्षय सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या उपस्थितीत या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार असून देशभरातील अनेक नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सेल्फी चित्रपटात अक्षय आणि इमरान हाश्मी
सेल्फी चित्रपटात अक्षय आणि इमरान हाश्मी

'सेल्फी' हा 2019 मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा हिंदी रिमेक आहे. लाल जूनियर दिग्दर्शित मल्याळम चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन आणि सूरज वेंजारामूडू यांच्या भूमिका होत्या.

सेल्फी चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे बनवला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करीत असून या चित्रपटाद्वारे पृथ्वीराज सुकुमारन आणि मॅजिक फ्रेम्स हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.

हेही वाचा - धनुषसोबत घटस्फोट झाल्यानंतर रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.