मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अक्षय कुमारने अॅक्शन चित्रपटांमधून थेट कॉमेडी झोनमध्ये प्रवेश केला आहे. बॉलीवूडमध्ये विनोदी चित्रपट करण्यात अक्षय मास्टर आहे. अक्षय अॅक्शननंतर आता कॉमेडी करण्यातही हिट झाला आहे. अक्षयची विनोदी शैलीही चित्रपटांपेक्षा वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. यामुळेच अक्षय कुठेही विनोद करण्यात मागे नाही. अक्षय सुपरहिट कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता, तिथे त्याने कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या शाही लग्नाची मस्करी करायलाही मागे पाहिले नाही.
सध्या अक्षय कुमार आणि सारा अली खान त्यांच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशात चित्रपटाची स्टारकास्ट 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचली. चित्रपटाच्या प्रमोशनचा सर्वात मोठा हिट शो मानला जातो. अक्षय कुमारसोबत चित्रपटाची लीड अॅक्ट्रेस सारा अली खान आणि दिग्दर्शक आनंद एल रॉयही पोहोचले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या शोमध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसलेला कॉमेडियन किकू शारदाने जेव्हा चित्रपटाच्या टीमसमोर कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाचा उल्लेख केला तेव्हा अक्षय कुमारनेही त्याची खिल्ली उडवली.
किकू शारदा म्हणाला, 'मी एका लग्नाला राजस्थानला गेलो होतो आणि तिथे सर्वकाही कौशल मंगल घडले", ते ऐकल्यानंतर अक्षय कुमार गंमतीने म्हणाला, 'तुम्ही तिथे किट कॅटही खाल्ले असेल.' अक्षय कुमारच्या या हजरजबाबीपणामुळे उपस्थित सर्व लोक प्रचंड हसले.
त्याचवेळी किकू शारदानेही अक्षयच्या या धमाल विनोदाचे कौतुक केले. विकी कौशल ९ डिसेंबरला लग्न करून कामावर परतला आहे. कॅटरिनाही जानेवारी 2022 मध्ये 'टायगर-3' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी सलमान खानसोबत दिल्लीला जाणार आहे. मात्र त्याआधी 20 डिसेंबरला या जोडप्याने मुंबईत ग्रँड वेडिंग रिसेप्शन आयोजित केले आहे, ज्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - 'अतरंगी रे' रिलीजपूर्वी सारा अली खानचे सत्यात उतरले स्वप्न