मुंबई - हल्ली एक गोष्ट प्रामुख्याने जाणवायला लागलीय टी म्हणजे बऱ्याच सिनेकलाकारांमध्ये एकापेक्षा अधिक गुण असतात. म्हणजे ते अभिनय करतंच असतात परंतु त्याव्यतिरिक्त त्यांच्यात इतरही कलागुण असतात जे लोकांसमोर आलेले नसतात. जसं की एखादा खेळ, मार्शल आर्टस्, पेंटिंग, ड्रेस डिझाईनिंग, मिमिक्री, शास्त्रीय वा पाश्चिमात्य नृत्य, गाणं इत्यादी इत्यादी. आता अजय देवगण च्या ‘मे-डे’ मध्ये त्याच्या पत्नीची भूमिका निभावणाऱ्या आकांक्षा सिंगचेच उदाहरण घ्या ना. ती गुणी अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर उत्कृष्ट गायिकाही आहे. नुकताच तिने तिच्या गोड आवाजात ‘रात कली इक ख्वाबमे आई, और गलेका हार हुई’ हे गाणं गायलं, सहज ती निवांत बसली होती तेव्हा.
२०१२ साली ‘ना बोले तुम ना मैने कुछ कहा’ मधून आकांक्षा सिंगने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांमधून तिने काम केले. वरुण धवन व आलिया भट अभिनित करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ मधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ती अजय देवगण दिग्दर्शित व अभिनित ‘मे-डे’ मध्ये महत्वपूर्ण भूनिकेतून दिसणार आहे.
तिने जेव्हा गाणं गातानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर पोस्ट केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हे क्लासिक गाणे तिने एवढ्या लीलया गात तिच्या जवळच्या मित्रांना पण आश्चर्यचकित केले. अनेकांनी तिची स्तुती करत म्हटले, आकांक्षा सिंग फक्त एक सुंदर चेहराच नाही तर तिच्या अभिनयाच्या कौशल्यांबरोबरच या सुंदर अभिनेत्रीला सुरेल आवाजाचा देवाचा आशीर्वादही मिळाला आहे. तिने 'रात कली इक ख्वाब में आयी', गीत गाताना तिचे जे गायन कौशल्य दाखविले आहे त्याला तोड नाही.
हेही वाचा - वास्तविकता काल्पनिकतेपेक्षाही विलक्षण असते' हे दर्शविणारी क्राइम मालिका 'मौका-ए-वारदात'!