हैदराबाद - बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर 2022 मध्ये त्याच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. करणच्या धर्मा प्रोडक्शनच्या वतीने बनलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटानंतर आता पॅन इंडियाच्या 'लाइगर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती करणने गुरुवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये चित्रपटाच्या शीर्षकासोबतच त्याची जगभरातील रिलीज डेटही समोर आली आहे. पोस्टर शेअर करताना करण जोहरने कॅप्शनमध्ये लिहिले, 'अॅक्शन, थ्रिल आणि वेडेपणा, एक मोठा धमाका होणार आहे.
-
THE ACTION, THE THRILL & THE MADNESS - it’s going to be a total knockout! #Liger arrives in theatres worldwide on 25th August, 2022. #LigerOnAug25th2022
— Karan Johar (@karanjohar) December 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Catch the first glimpse on 31st Dec and start your new year with a BANG!💥 pic.twitter.com/dj1TBgVbUW
">THE ACTION, THE THRILL & THE MADNESS - it’s going to be a total knockout! #Liger arrives in theatres worldwide on 25th August, 2022. #LigerOnAug25th2022
— Karan Johar (@karanjohar) December 16, 2021
Catch the first glimpse on 31st Dec and start your new year with a BANG!💥 pic.twitter.com/dj1TBgVbUWTHE ACTION, THE THRILL & THE MADNESS - it’s going to be a total knockout! #Liger arrives in theatres worldwide on 25th August, 2022. #LigerOnAug25th2022
— Karan Johar (@karanjohar) December 16, 2021
Catch the first glimpse on 31st Dec and start your new year with a BANG!💥 pic.twitter.com/dj1TBgVbUW
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या दोन आठवड्यांपूर्वी 'लिगर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'लिगर' 25 ऑगस्ट 2022 रोजी, 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यासोबतच करण जोहरने चाहत्यांना वचनही दिले आहे की या वर्षाच्या सुरुवातीला (31 डिसेंबर) 'लाइगर' चित्रपटाची एक झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'लाइगर' चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन माइक टायसन देखील असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी केले आहे. विजयचा हा बॉलिवूड डेब्यू चित्रपट आहे.
हेही वाचा - हरनाझच्या कुटुंबीयांची जंगी स्वागताची तयारी