नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्यावर महाराष्ट्रात असलेले सर्व खटले हिमाचल प्रदेशमध्ये हस्तांतरीत करावेत अशी मागणी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांनी केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत त्यांनी ही मागणी केली आहे.
शिवसेना नेत्यांकडून जीवाला धोका..
मुंबईमधील शिवसेना नेत्यांचे आपल्यासोबत वैर असून, मुंबईमध्ये आपल्या खटल्यांवर सुनावणी झाल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याचे कंगना आणि तिच्या बहिणीने म्हटले आहे. मुंबईमध्ये कंगनाविरोधात तीन खटल्यांवर सुनावणी सुरु आहे.
कंगनाविरोधात तीन खटले दाखल..
या तीन खटल्यांमधील दोन खटले हे तिने मुंबईबाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्विट्सविरोधात आहेत. तर, तिसरा खटला हा गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर कंगनाने त्यांच्याविरोधात टिप्पणी केली होती. यामुळे त्यांनी तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
हेही वाचा : ७८ वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स : विजेत्यांची यादी