ETV Bharat / sitara

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरिकेतून वाहिली राजीव कपूर यांना श्रद्धांजली! - अश्विनी भावे अमेरिकेत वास्तव्यास

अश्विनी भावे अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांनी आरके फिल्मस्च्या हीना चित्रपटात नायिकेची भूमिका साकारली होती. ‘हिना’च्या वेळी राजीव कपूर एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होते. काल राजीव कपूर गेल्याची बातमी ऐकल्यावर अश्विनी यांना धक्काच बसला. त्यांनी एका व्हिडीओमार्फत ‘चिंपू’ कपूर ला श्रद्धांजली वाहिली आहे.

pays-homage-to-rajiv-kapoo
राजीव कपूर यांना श्रद्धांजली
author img

By

Published : Feb 10, 2021, 5:36 PM IST

अश्विनी भावे हे हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील मराठी हिरॉईनस् पैकी एक मोठे नाव. धडाकेबाज, अशी ही बनवा बनवी, कळत नकळत सारख्या अनेक मराठी चित्रपटांतून तिने लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन, विक्रम गोखले अशा दिग्गज नटांबरोबर काम केलं. त्यानंतर तिची चक्क ऋषी कपूरची हिरॉईन म्हणून शोमन राज कपूर यांनी आर के बॅनरच्या ‘हिना’ मध्ये निवड केली. त्यानंतर अश्विनी भावे यांनी मागे वळून पाहिलं नाही आणि हिंदी चित्रपटांत यशस्वी नायिकेचे स्थान मिळविले.

अभिनेत्री अश्विनी भावे
‘हिना’ च्या निवडीबद्दल त्यांनी मागे सांगितले होते की, “मी एकदा घरी पोहोचल्यावर माझ्या आईने सांगितले की कोणा ‘आर के’ मधून फोन आला होता. तुला भेटायला बोलावलंय. त्यावेळी फक्त लँडलाईन फोनच होते. प्रथम मला कळेना की आर के मधून मला का फोन येईल. तरीही म्हटलं बघूया म्हणून. मी सांगितलेल्या दिवशी व वेळेवर ‘आर के’ त पोहोचले तेव्हा मला कळले की मला खरंच भेटायला बोलावलंय. त्याचं असं झालं होतं की मी प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे फोटो सेशन केले होते. त्याच सुमारास रणधीर कपूर यांचा गौतम यांना फोन आला होता की आम्ही एक नवीन चित्रपट करतोय. कोणी छान नवीन मुलगी असेल तर कळव. गौतमजींनी माझे फोटो पाठवून दिले होते हे सांगत की मी चांगली अभिनेत्रीसुद्धा आहे म्हणून. आर केमध्ये माझी रीतसर ऑडिशन झाली व मला कळविण्यात आले की ‘हिना’मध्ये चांदनीच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली आहे. तो चित्रपट माझे सारे आयुष्य बदलणारा ठरला.”‘हिना’च्या वेळी राजीव कपूर एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होता व त्याने अश्विनीजींना नेहमीच ‘आर के’च्या हिरॉइन्स प्रमाणे प्रेमाने वागविले. त्यांच्यात छान मैत्रीसुद्धा झाली. सध्या अश्विनीजी अमेरिकेत वास्तव्यास आहेत. लग्नानंतर त्या तिथे शिफ्ट झाल्या व आपल्या कुटुंबासोबत त्या आनंदी आहेत. काल राजीव कपूर गेल्याची बातमी ऐकल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांनी एका व्हिडीओमार्फत ‘चिंपू’ कपूर ला श्रद्धांजली वाहिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.