ETV Bharat / sitara

मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन - major Bikramjeet Kanwarpal corona news

अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचा 52 व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बिक्रमजीत कंवरपाल सैन्यात मेजर होते आणि तेथून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपला अभिनयाचा छंद जोपासण्यासाठी 2003 साली मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकले. बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी शोक प्रकट केला.

बिक्रमजीत कंवरपाल
बिक्रमजीत कंवरपाल
author img

By

Published : May 1, 2021, 7:41 PM IST

Updated : May 1, 2021, 9:37 PM IST

मुंबई - अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचा 52 व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बिक्रमजीत कंवरपाल सैन्यात मेजर होते आणि तेथून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपला अभिनयाचा छंद जोपासण्यासाठी 2003 साली मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकले. थोड्याच कालावधीत त्यांनी चित्रपट, मालिकांमध्ये उत्तम चरित्र अभिनेता म्हणून नाव कमावले. ते सेटवर नेहमी वेळेवर हजर असत आणि काम संपल्याशिवाय तेथून निघत नसत. बिक्रमजीत यांनी शाहरुख खान, सलमान खान, अनिल कपूर आदी मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण, आता हे सर्व भूतकाळात जमा झाले आहे.

बिक्रमजीत कंवरपाल यांनी पेज 3, रॉकेट सिंग : सेल्समन ऑफ द ईयर, आरक्षण, मर्डर 2, टू स्टेट्स, द गाझी अटॅक, जब तक हैं जान, कॉर्पोरेट, प्रेम रतन धन पायो सारखे अनेक चित्रपट आणि दिया और बाती हम, ये हैं चाहतें, कसम तेरे प्यार की, तेनाली रामा सारख्या अनेक मालिकांमधून आपल्या कडक अभिनयाची छाप सोडली. अवरोध, अनदेखी, युअर ऑनर, अनिल कपूरच्या ‘24’ व नीरज पांडे यांच्या ‘स्पेशल ऑप्स’ सारख्या वेब सिरीज मधूनही ते झळकले.

बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी शोक प्रकट केला. निल नितीन मुकेश, गुलशन देवैयाह, सोफी चौधरी, निम्रत कौर, नकुल मेहता, गुरमीत चौधरी, रोहित बोस रॉय, शिवांगी वर्मा, विशाल ददलानी, बिदीता बाग, रिचा चड्ढा, विक्रम भट, मधुर भांडारकर सारख्या अनेकांनी समाज माध्यमांवर दुःख व्यक्त केले.

हेही वाचा - अभिनेता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Last Updated : May 1, 2021, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.