ETV Bharat / sitara

गरजू पेशंट्सना ऑक्सिजन मिळावा यासाठी हर्षवर्धन राणेने विकली बुलेट

बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे याने सायबरबाद पोलिसांना ऑक्सिजन केंद्राची देणगी दिली आहे. कोविडशी लढा देणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी त्याने रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी ही बाईक विकली.

Harshvardhan Rane
हर्षवर्धन राणेने विकली बुलेट
author img

By

Published : May 13, 2021, 7:09 PM IST

हैदराबाद - गरजूंसाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनेता हर्षवर्धन राणे याने आपली रॉयल एनफिल्ड मोटरबाईक विकली आहे. या मोबदल्यात मिळालेली ३ ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स सायबराबाद पोलिसांच्याकडे त्याने सुपूर्त केली आहेत.

हर्षवर्धन राणे याच्या शर्टॉफ फाऊंडेशनच्या वतीने स्वयंसेवक अभिलाष इलाप्रोलू याने सायबरबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स दिली आहेत.

सायबरबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी. सज्जनार आणि सोसायटी फॉर सायबरबाद सिक्युरिटी कौन्सिल (एससीएससी) यांनी हर्षवर्धन राणे याच्या उदारपणाचे कौतुक केले आहे.

हर्षवर्धन हा उत्साही बाइकर आहे. त्याने गेल्या महिन्यात सोशल मीडियावर एक पिवळ्या रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी (बुलेट)चा फोटो पोस्ट केला होता आणि लिहिले होते की काही ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स गरजूंना देण्यासाठी मोबदल्यात ही मोटरबाईक देण्यास तयार आहे.

"कोविडच्या काळात गरजू लोकांच्या मदतीसाठी नवीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठीच्या बदल्यात माझी मोटरसायकल दिली", असे हर्षवर्धनने लिहिले आहे. गेल्या वर्षी त्यालाही कोरोनाची लागण झाली होती.

"चांगली बातमी. इन्स्टाग्रामवर आपण दिलेल्या जलद मदतीमुळे आणि त्वरित ऑफर दिल्यामुळे ३ ऑक्सिजन केंद्रे हैदराबादला पोहोचली आहेत. आणखी काही लवकरच पोहोचणे अपेक्षित आहेत," त्याने गेल्या आठवड्यात पोस्ट केले होते.

हर्षवर्धन राणे यांनी २०१६ मध्ये आलेल्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने "ना इष्टम", "प्रेमा इश्क कढाल", "अवुनू 2", "कवचम" आणि "अनामिका" या तेलगू चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.