मुंबई - मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Amol Palekar In Hospitalized ) आहे. प्रकृती अस्वस्थामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु ( Amol Palekar Admitted In Pune ) आहेत. अमोल पालेकर ( Actor Amol Palekar Health Update ) यांच्या सहचारिणी संध्या गोखले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, काळजी करण्याचे कारण नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
मात्र, संध्या गोखले यांनी अमोल पालेकर यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कारण सांगण्यास नकार दिला आहे. अमोल पालेकर यांनी रजनीगंधा, छोटीसी बात, चितचोर, गोलमाल सारख्या इतर अनेक चित्रपटांतून मध्यम वर्गीय हिरो सफाईदारपणे सादर केला आहे. तर, हृषिकेश मुखर्जी, बसू चॅटर्जी सारख्या संवेदनशील दिग्दर्शकांचे ते लाडके अभिनेते आहे.
अमोल पालेकर यांनी नाटकं आणि सिनेमांतून अनेक भूमिका केल्या आणि जवळपास सर्वच प्रेक्षकांना आवडल्या आहेत. ‘पहेली’ या हिंदी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते ज्यात शाहरुख खानने भूमिका केली होती. ‘पहेली’ मध्ये किंग खानने दुहेरी भूमिका साकारली होती आणि हा चित्रपट ऑस्करसाठी गेला होता. दरम्यान, अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते लवकरच घरी परततील.
‘२००- हल्ला हो’ या चित्रपटाद्वारे अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांचे बऱ्याच काळानंतर पडद्यावर पुनरागमन होत आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून त्यातील प्रेरित दमदार कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. याची गोष्ट आहे, २०० दलित स्त्रियांची ज्यांनी एकत्र येऊन गुंडगिरी करणाऱ्या टोळ्या, लुटेरे आणि बलात्काऱ्यांविरुद्ध कोर्टामध्येच कायदा आणि न्याय स्वतःच्या हातात घेतला.