मुंबई - अभिनेता आमिर खानवर सध्या जोरदार टीकेची झोड उठवली जात आहेत. तो काही मुलांसोबत क्रिकेट खेळत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात आमिरने किंवा मुलांपैकी कोणीही मास्क घातलेला नाही. त्यामुळे तो किती बेफिकीर आहे असे म्हणत सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे.
सेलेब्रिटी फोटोग्राफर विराल भायानी यांनी आमिर खानचा हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. त्यानंतर आमिर खानच्या विरोधात सोशल मीडियात वादळ निर्माण झाले. या व्हिडिओत आमिर मुंबईमध्ये मास्क न घालता क्रिकेट खेळताना दिसतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमिर बराच ट्रोल होत आहे.
सोशल मीडिया युजर्सनी आमिरच्या या बेजबाबदारपणावर नाराज व्यक्त करायल्या सुरूवात केली.
''आमिर खान को मास्क की जरुरतही नहीं है अब. लगता है वॅक्सीन ले ली है बडे भाईने,'' असे एका युजरने म्हटलंय.
तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, ''इररिस्पॉन्सिबल आमिर साहब मास्क को जमीन पे रखता? रोल मॉडेल हो पर इतना क्लिननेस नहीं है आपका.''
टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंटनेही याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना म्हटलंय, "यातील कोणीच मास्क घातलेला नाही? का? कसे काय?"
हेही वाचा - केजीएफ स्टार यशने कोरोनामुळे रद्द केले बर्थ डे सेलेब्रिशन