मुंबई - आमिर खानने 'शिकारा' चित्रपटाच्या यशासाठी निर्माता दिग्दर्शक विधु विनोद चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत. 'शिकारा - द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडीत' आज देशभर रिलीज झाला.
'शिकारा - द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिर पंडीत' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. आमिर खानने ट्विटरवरुन विधु विनोद चोप्राला शुभेच्छा दिल्या आहे. आमिरने लिहिलंय, ''विनोद, खूप शुभेच्छा. अलिकडचा इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटनेवर आधारित शिकारा हा चित्रपट आहे. ही कथा सांगण्याची गरज आहे.''
-
Wishing you all the very best Vinod!
— Aamir Khan (@aamir_khan) February 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Shikara is a film about one of the most tragic events in our recent history. A story that needs to be told. https://t.co/IjssVfrwus
">Wishing you all the very best Vinod!
— Aamir Khan (@aamir_khan) February 7, 2020
Shikara is a film about one of the most tragic events in our recent history. A story that needs to be told. https://t.co/IjssVfrwusWishing you all the very best Vinod!
— Aamir Khan (@aamir_khan) February 7, 2020
Shikara is a film about one of the most tragic events in our recent history. A story that needs to be told. https://t.co/IjssVfrwus
आमिर खानने विधु विनोद चोप्रासोबत अनेक सिनेमात काम केले आहे.
'शिकारा - द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडीत' ही कथा काश्मीरच्या १९९० साली घडलेल्या घटनेवर आधारित आहे. काश्मीरच्या एका समुदायाला बेघर करण्यात आले होते. ३० वर्षानंतरही ते आपल्या घरी परतू शकले नाही.
या चित्रपटातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सादिया आणि आदिल खान हे दोघेही या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. सादिया शांतीची भूमिका साकारत आहे तर आदिल शीवच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी केलं आहे.
७ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत करण्यात आली आहे