मुंबई - अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला आता तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. डिसेंबरमध्ये पार पडलेल्या त्यांच्या लग्नापासून हे जोडपे स्वतःचे सुंदर फोटो शेअर करत आहेत पण चाहत्यांना हे पुरेसे वाटत नाही. विकॅट ( VicKat ) च्या चाहत्यांसाठी कॅटरिनाने पती विकीसोबतचे दोन प्रेमाने भरलेले फोटो शेअर केले आहेत.
विकी आणि कॅटरिनाचे नवीन फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक मेजवानी आहेत. कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केलेल्या दोन सेल्फीमध्ये हे दोघे काही खास क्षण शेअर करताना दिसत आहेत. तिच्या सोशल मीडिया हँडलवर कॅटरिनाने विकीसोबत पहाटे एक सेल्फी पोस्ट केला ज्यामध्ये ती विकीच्या खांद्यावर डोके ठेवताना दिसत आहे. फोटोमध्ये विकी पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे.
हे जोडपे पहाटे लवकर उठले कारण कॅटरिनाने फोटोसोबत एक स्टिकर देखील शेअर केला होता ज्यामध्ये लिहिले होते, "माफ करा मला झोप लागली आहे". पहिला फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, कॅटरिनाने विकीसोबत आणखी एक सेल्फी टाकला ज्यामध्ये तो तिच्या खांद्यावर डोके ठेवून हसताना दिसत आहे.
कामाच्या आघाडीवर कॅटरिनाने अलीकडेच श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस'साठी शूट सुरू केले आहे. तर विकी दिग्दर्शक आनंद तिवारीच्या पुढच्या चित्रपटात व्यस्त आहे ज्यात तृप्ती डिमरी आणि अम्मी विर्क देखील मुख्य भूमिकेत आहेत.
हेही वाचा - 'द काश्मीर फाइल्स' वाद : अनुपम खेर यांच्या खुलाशाने कपिल शर्माचा जीव भांड्यात पडला