मुंबई - सध्या जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. यामुळे आतापर्यंत लाखो बळी गेले आहेत. अशा कठीण प्रसंगात सर्व वैद्यकीय कर्मचारी निस्वार्थ आणि धाडसी पणाने रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्यासाठी आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आपल्या एका पोस्ट द्वारे आभार मानले आहेत.
हा संदेश सर्व देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे. जे निस्वार्थ आणि धाडसाने रुग्णांची सेवा करत आहेत. अशा कठीण काळात स्वतः चा जीव संकटात घालून हे सर्व रुग्णांवर उपचार करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व भेदभाव विसरून एकत्र येऊन लढा देण्याची ही वेळ आहे, असे त्यांनी आपल्या या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
-
This message is to thank the doctors, nurses and all the staff working in hospitals and clinics all around India, for their bravery and selflessness... pic.twitter.com/fjBOzKfqjy
— A.R.Rahman (@arrahman) April 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This message is to thank the doctors, nurses and all the staff working in hospitals and clinics all around India, for their bravery and selflessness... pic.twitter.com/fjBOzKfqjy
— A.R.Rahman (@arrahman) April 1, 2020This message is to thank the doctors, nurses and all the staff working in hospitals and clinics all around India, for their bravery and selflessness... pic.twitter.com/fjBOzKfqjy
— A.R.Rahman (@arrahman) April 1, 2020
तसेच ज्येष्ठ व्यक्ती, शेजारी आणि गरजवंताना मदत करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रशासनाचे नियम पाळा. तसेच, आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. इतर अनेकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणे आपल्या हातात आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.