ETV Bharat / sitara

बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर बनणार बायोपिक - बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद

भारतीय बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चरित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते आनंद एल राय करणार आहेत. आनंद यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

grandmaster Viswanathan Anand
बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद
author img

By

Published : Dec 14, 2020, 7:20 PM IST

मुंबई - भारतीय बुद्धीबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली असून त्याचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते आनंद एल राय करणार आहेत. याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी रविवारी ट्वीट करुन दिली आहे. त्यांनी लिहिलंय, "विश्वनाथन आनंदची बायोपिक. इंडियन चेस ग्रँडमास्टर विश्वनाथनवरील बायोपिक. एक शीर्षक नसलेले बायोपिक आनंद एल द्वारा दिग्दर्शित केले जाणार आहे. त्याचे दिग्दर्शन सुंदर एंटरटेनमेंट (महावीर जैन) आणि कलर यलो प्रॉडक्शन (आनंद एल. राय) करणार आहेत. "

grandmaster Viswanathan Anand
तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली माहिती

पाचवेळा विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांनी ११ डिसेंबर रोजी आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला.

आनंद यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटरवर लिहिले होते, सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल खूप आभार. माझा कुटुंबासोबत एक शांत दिवस पार पडला. यात एक चॉकलेट केक (अरुण आणि अखिल यांनी बनवलेला) सहभागी होता.''

हेही वाचा - रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गोव्याला रवाना

या शीर्षक नसलेल्या चित्रपटात आनंद राय यांच्या दिग्दर्शनाखाली कोणता अभिनेता बुद्धिबळ ग्रँडमास्टरची भूमिका साकारेल हे अद्याप कळलेले नाही.

हेही वाचा - स्पोर्ट्स ब्रँडसाठी शूट करताना करिनाने शेअर केला बेबी बंपचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.