ETV Bharat / sitara

डीडीएलजेची २५ वर्षे : लंडनच्या लिसेस्टर स्क्वेयरमध्ये बसवणार शाहरुख-काजोलचा पुतळा - SRK latest news

डीडीएलजे चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने लंडनमधील लीसेस्टर चौकात डीडीएलजेचे प्रमुख कलाकार शाहरुख खान आणि काजोल यांचा कांस्य पुतळा बसवण्यात येणार आहे. यूकेच्या हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने ही घोषणा केली आहे.

25 years of DDLJ
डीडीएलजेची २५ वर्षे
author img

By

Published : Oct 20, 2020, 4:47 PM IST

मुंबई - बॉलिवूड ब्लॉकबस्टर 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' (डीडीएलजे)चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने लंडनमधील लिसेस्टर चौकात डीडीएलजेचे प्रमुख कलाकार शाहरुख खान आणि काजोल यांचा कांस्य पुतळा बसवण्यात येणार आहे. बॉलिवूडचा हा पहिला चित्रपट आहे ज्याची मुर्ती लीसेस्टर स्क्वेयरमध्ये बसवली जाईल.

यूकेच्या हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने ही घोषणा केली आहे. शाहरुख खान आणि काजोल यांचा पुतळा या चौकाचे आकर्षण ठरेल यात काही शंका नाही.

लेखक-दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात डीडीएलजेपासून केली होती. या बॉलिवूड रोमँटिक चित्रपटाने अनेक विक्रम मोडले होते.

यश राज फिल्म्स (वायआरएफ) प्रॉडक्शन आणि जतीन-ललित यांनी संगीत दिलेल्या गाण्यांसाठीही हा चित्रपट संस्मणीय मानला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.