सॅनफ्रान्सिस्को- अॅपल वॉचचे जगभरात १० कोटी वापरकर्ते असल्याचे नेल सायबार्ट या विश्लेषकाने जाहीर केले आहे. या विश्लेषकाच्या माहितीनुसार अॅपल वॉचची संख्या सहा वर्षांहून कमी काळात १० कोटीहून अधिक झाली आहे.
नेल सायबार्ट हे अॅपल कंपनीच्या कामगिरीचे विश्लेषक आहेत. अॅपल वॉचचे २०२० मध्ये ३० दशलक्ष वापरकर्ते वाढले आहेत. ही संख्या २०१५, २०१६ आणि २०१७ या तीन वर्षांहून अधिक आहेत. अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅक हे वापरकर्त्यांना सर्वाधिक प्रमाणात वापरण्यात येते. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अॅपल वॉचचा क्रमांक आहे.
हेही वाचा-महागाईचा भडका! खाद्यतेलाच्या किमतीत जानेवारीत २० टक्क्यांची वाढ
- सध्याची अॅपल वॉचची विक्री पाहता २०२२ मध्ये अॅपल वॉच हे मॅकला मागे टाकेल.
- जगात सर्वाधिक अमेरिकेमध्ये अॅपल वॉचचा व्यवसाय होत आहे.
- वर्ष २०२० अखेरीस आयफोन वापरकर्त्यांपैकी ३५ टक्के लोक हे अॅपल वॉचचा वापर करतात. अनोख्या वैशिष्ट्यांमुळे ग्राहक हे अॅपल वॉचला पसंती देत आहेत.
वेअरेबल्स मार्केटमध्ये असा आहे हिस्सा-
जगभरातील वेअरेबल्स मार्केटमध्ये अॅपल वॉचचा ५५ टक्के हिस्सा आहे. तर सॅमसंगचा हिस्सा १३.९ टक्के आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ८ टक्के हिस्सा असलेली गारमिन कंपनी आहे.