ETV Bharat / science-and-technology

Truecaller App New Feature : ट्रू कॉलरने आयफोन वापरकर्त्यांसाठी आणले नवीन फिचर, जाणून घ्या काय आहेत फायदे - व्यवस्थापकीय संचालक ऋषी झुनझुनवाला

ट्रू कॉलरने आयफोन वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर लाँच केले आहे. या फिचरमुळे आयफोन वापरकर्त्यांना कॉलरबाबतची माहिती काही सेकंदात मिळत असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

Truecaller App New Feature
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 13, 2023, 5:25 PM IST

नवी दिल्ली : जगभरात सद्या कॉलवर फसवणुकीचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नागरिक कॉल करण्यासाठी ट्रू कॉलर या ॲपचा वापर करुन अशा स्पॅम कॉलपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात. सध्या ट्रू कॉलर ही स्पॅम कॉल ओळखण्यासाठी आघाडीची कंपनी असल्याचे बोलले जाते. ट्रू कॉलरने आयफोन वापरकर्त्यांसाठी खास फिचर लाँच केले आहे. याबाबतची माहिती ट्रू कॉलरचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक ऋषी झुनझुनवाला यांनी बुधवारी दिली आहे.

आयफोनच्या श्रीसोबत ओळखता येणार कॉलर : ट्रू कॉलरने आणलेले हे जबरदस्त फिचर आयफोन वापरकर्त्यांना फार सुविधाजनक असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. बुधवारी ट्रू कॉलरने दिलेल्या माहितीनुसार त्याचा लाइव्ह कॉलर आयडी आता प्रथमच भारतासह जगभरातील आयफोनवर प्रीमियम ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ही सेवा आयफोनवर कॉल करणार्‍या वापरकर्त्याला सांगण्यासाठी एक साधा श्री शॉर्टकट वापरत असल्याचेही ऋषी झुनझुनवाला यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही आयफोनच्या वापरकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद पाहत आहोत. आम्ही आयफोनच्या धारकांसाठी सतत नवनवीन शोध घेत आहोत. आमच्या पथकाने श्री समर्थित लाइव्ह कॉलर आयडी तयार करण्यासाठी खूप सर्जनशीलतेचा वापर केल्याची माहितीही ऋषी झुनझुनवाला यांनी दिली आहे.

आयफोन वापरकर्त्यांना असा घेता येणार लाभ : आयफोनवर ट्रू कॉलरच्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला ॲपमधील प्रीमियम टॅबवर जाणे आवश्यक आहे. त्यानंतर 'Add to Siri' वर क्लिक करण्याची आवश्यकता आहे. यानंतर जेव्हा इनकमिंग कॉल येईल तेव्हा फक्त 'Hey Siri, Search Truecaller असे म्हटल्यानंतर कोण कॉल करत आहे, त्याबाबतची माहिती मिळणार आहे. वापरकर्त्यांनी ही माहिती विचारल्यानंतर ॲप त्वरीत नंबर कॅप्चर करुन कॉलरबद्दल अधिक माहिती मिळवते. त्यानंतर ही माहिती कॉलिंग स्क्रीनच्या शीर्षस्थानी सादर करते, असेही यावेळी कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काही सेकंदात मिळतात अचूक परिणाम : आयफोनवर करण्यात आलेल्या कॉलरची माहिती काही सेकंदात ट्रू कॉलर देत असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हे नवीन वैशिष्ट्य ट्रू कॉलर प्रीमियम सदस्यांसाठी iOS 16 आणि नवीन चालणार्‍या उपकरणांवर उपलब्ध आहे. ते काही सेकंदात जलद आणि अचूक परिणाम देण्यासाठी श्री Siri शॉर्टकट आणि ॲप इंटेंट्सचा लाभ घेत असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीसह लाइव्ह कॉलर आयडी संपूर्ण ट्रू कॉलर डेटाबेस शोधून Android वर ट्रू कॉलर सारखीच माहिती देत असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.