नवी दिल्ली : सध्या तरुणाईला बर्गर, पेस्ट्री आणि डोनट्स खायला खूप आवडतात. हे स्वादिष्ट पदार्थ कागदी पिशव्या आणि कंपोस्टेबल कागदात पॅक केलेले असतात. मात्र यामुळे आरोग्याला मोठा धोका होण्याची शक्यता आहे. पर्यावरणासाठीही हे हानिकारक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. प्लास्टिक, कागदी पिशव्या आणि कंपोस्टेबल खाद्यपदार्थांच्या कंटेनरवर बंदी असताना अनेक ग्राहक याचा सर्रास वापर करत आहेत. यामध्ये परफ्लुओक्टेन सल्फेट नावाचे रसायन असून त्याचा आरोग्याला धोका असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
पेपर फूड पॅकेजिंगमध्ये आढळली विषारी रसायने : सध्या अनेक अन्न पॅकेज करुन विकण्यात येतात. मात्र या पेपर बॅगमध्ये विषारी रसायने असल्याचा दावा कॅनडा, अमेरिका आणि स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी केला आहे. ही रसायने हळूहळू अन्नात मिसळून यकृताला मोठा धोका निर्माण होतो. त्यासह पर्यावरणालाही या विषारी रसायनाचा धोका निर्माण होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. कॅनडा, अमेरिका आणि स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी फेब्रुवारी ते मार्च 2020 दरम्यान टोरंटोमध्ये याबाबतचे संशोधन केले आहे. या संशोधकांनी 42 प्रकारच्या पेपर फूड पॅकेजिंगची चाचणी केली. यात कंपोस्टेबल पेपर बाऊल्स, सँडविच, बर्गर रॅपर्स, पॉपकॉर्न सर्व्हिंग बॅग आणि डोनट्ससारख्या अन्नाच्या पिशव्यांचा समावेश असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.
पेपर बॅगमध्ये आढळून आले फ्लोरिन : या संशोधकांनी केलेल्या संशोधनात या पेपर बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लोरिन आढळून आल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या संशोधकांनी केलेल्या चाचणीत 45 टक्के फ्लोरिन असल्याचे आढळले आहे. या फ्लोरिनमध्ये पीएफएएस असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. हे संशोधन एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. बर्गर, पेस्ट्री आणि डोनट्स यांसारख्या स्निग्ध पदार्थांसाठी वापरल्या जाणार्या कागदी पिशव्यात हे फ्लोरिन आढळून आल्याने मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यासह कंपोस्टेबल कागदाच्या भांड्यांमध्ये फ्लोरिन आणि पीएफएएसची उच्च पातळी आढळून आल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
खाद्य पॅकेजिंगमध्ये पीएफएएसचा वापर : बॅगच्या कच्च्या लगद्यामध्ये भरपूर पीएफएएस मिसळणे आवश्यक आहे. त्यामुळे ते मजबूत होऊन द्रव पदार्थांच्या संपर्कात आल्यावर त्याचे विघटन होऊ नये, असे संशोधकांनी सांगितले. खाद्य पॅकेजिंगमध्ये पीएफएएसचा वापर कंपोस्टेबल बाऊल्स हे एकल वापरलेल्या प्लास्टिक फूड पॅकेजिंगच्या पर्यायाचे प्रतिनिधित्व करते असेही या अभ्यासात दिसून आले आहे. पीएफएएस हे खाद्यपदार्थ ठेवणाऱ्या पॅकेजिंगमधून अन्नामध्ये प्रवेश करण्यासाठी ओळखले जात असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
हेही वाचा - AI Tool For Cosmos Images : अवकाशातील फोटो स्पष्टपणे काढता येणार, संशोधकांकडून एआयचे टूल विकसित